राजस्थानमध्ये बसपचा हत्ती किती जणांचे निकाल बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 06:11 AM2023-11-22T06:11:00+5:302023-11-22T06:11:32+5:30

अनेक ठिकाणी राहू शकताे निर्णायक, मायावतींच्या नव्या राजकीय खेळीकडे लक्ष

BSP's elephant will change the results of how many people in Rajasthan? | राजस्थानमध्ये बसपचा हत्ती किती जणांचे निकाल बदलणार?

राजस्थानमध्ये बसपचा हत्ती किती जणांचे निकाल बदलणार?

जयपूर : मतांची विभागणी निवडणुकीच्या निकालाचे संपूर्ण समीकरण बदलू शकते. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीने (बसप) २५ पेक्षा जास्त जागांवरील निकाल प्रभावित केले हाेते. बसपच्या उमेदवारांनी जेवढी मते मिळविली, त्याचा भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या निकालावर परिणाम झाला. त्यामुळे यावेळीही बसपचा हत्ती राजस्थानात किती जणांचे निकाल ठरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बसपचा प्रभाव किती?

nराजस्थानात मायावती यांचा पक्ष निकालांवर परिणाम करू शकण्याच्या स्थितीत आहे की नाही, याकडे राजकीय दिग्गजांचे लक्ष लागले आहे. 
nबसपच्या प्रमुख मायावती यांनी विधानसभा निवडणुकीत खेळलेली राजकीय चाल थेट लाेकसभा निवडणुकीवर प्रभाव पाडू शकेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
n२००८च्या निवडणुकीत बसपने ७.५ टक्के मते मिळविली हाेती, तर २०१८ मध्ये यात घट हाेऊन मतांचे प्रमाण ४ टक्क्यांवर आले. 
n२०१८ मध्ये बसपचे ६ उमेदवार विजयी झाले, तर सुमारे २५ पेक्षा जास्त जागांवर मतांचे समीकरण पालटले.

काय आहे मायावतींची राजकीय खेळी?

बसपचे आमदार विधानसभेत जातात. अपेक्षित जनाधार प्राप्त करू शकत नाही. सत्तेत सहभागी न हाेणे, हे यामागील कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

यावेळी आपल्या पक्षामुळे काेणाचे सरकार स्थापन झाल्यास आपण सरकारमध्ये सहभागी हाेऊ, असे मायावतींनी जाहीर केले आहे. याचा लाेकसभा  निवडणुकीवरही परिणाम हाेऊ शकताे.

बसपने ४ ते ५ टक्के मते प्राप्त केल्यास २० ते २५ जागांचा निकाल थेट प्रभावित हाेऊ शकताे. 

१८५ उमेदवार बसपने यावेळी दिले आहेत.

 

Web Title: BSP's elephant will change the results of how many people in Rajasthan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.