गेहलोत पुत्राला ED ची नोटीस, मुख्यमंत्री संतापले; म्हणाले, “संपूर्ण देशात दहशत माजवलीय”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 01:58 PM2023-10-26T13:58:09+5:302023-10-26T14:01:25+5:30

Rajasthan CM Ashok Gehlot: अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना ईडीने नोटीस बजावत तत्काळ हजर होण्यास सांगितले आहे.

cm ashok gehlot attacks bjp and central govt after ed summons son vaibhav gehlot before rajasthan assembly election 2024 | गेहलोत पुत्राला ED ची नोटीस, मुख्यमंत्री संतापले; म्हणाले, “संपूर्ण देशात दहशत माजवलीय”

गेहलोत पुत्राला ED ची नोटीस, मुख्यमंत्री संतापले; म्हणाले, “संपूर्ण देशात दहशत माजवलीय”

Rajasthan CM Ashok Gehlot: काही दिवसांनी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रचाराला वेग येताना दिसत आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाला अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ED ने नोटीस बजावली असून, हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याला दुजोरा देताना अशोक गेहलोत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या लोकांनी संपूर्ण देशात दहशत माजवली असल्याची टीका गेहलोत यांनी केली आहे. 

माझ्या मुलगा आहे, हा प्रश्न नाही. छत्तीसगडमध्ये तर लोकांनी कुटुंबीयांना स्थलांतरीत केले आहे. आम्ही महिला आणि मागासवर्गीयांसाठी नव्या योजना आणल्या असून, त्याची घोषणा केली. मात्र, या लोकांना आम्ही महिला तसेच मागासवर्गीय समाजासाठी काहीतरी करावे, असे वाटत नाही. गोविंद सिंह डोटासरा यांना कोणतीही नोटीस बजावलेली नाही. त्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. माझा मुलगा वैभव याला नोटीस बजावली आहे आणि एका दिवसांत हजर होण्यास सांगितले आहे. ही काय चेष्टा लावली आहे का, अशी विचारणा करत, ईडी आणि भाजपसाठी लवकरच वाईट दिवस येतील, या शब्दांत अशोक गेहलोत यांनी हल्लाबोल केला.

सरकार पाडू शकत नाही म्हणून मला टार्गेट केले जात आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा मला टार्गेट करत आहेत, कारण ते इथले सरकार पाडू शकत नाहीत. त्यांनी पाच राज्यांतील सरकार पाडले आहे. त्यांनी राजस्थान काँग्रेस अध्यक्षांवर छापा टाकला आहे, पण आम्ही घाबरत नाही. डीके शिवकुमार यांच्यावर हल्ला झाला आणि कर्नाटकातून भाजप गायब झाली, अशी आठवण करून देत गेहलोत यांनी भाजपवर टीका केली. दुसरीकडे, २०११ मध्ये हॉटेलचे २५०० शेअर्स खरेदी करून मॉरिशसस्थित फर्मकडून ट्रायटन हॉटेल्सकडे तो पैसा वळवण्यात आला. हे शेअर्स ३९,९०० रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्यात आले होते. मात्र, त्या शेअरची खरी किंमत १०० रुपये होती. वैभव गेहलोत यांची एक टॅक्सी कंपनी आहे. त्यात ते प्रथम भागीदार होते. 

दरम्यान, ही १२ वर्षे जुनी बाब आहे. केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करत आहे. निवडणुकीपूर्वी या गोष्टी होणार हे आम्हाला माहिती होते. आमचे प्रदेशाध्यक्ष गोविंद डोटासरा यांच्या घरावरही छापा टाकला. त्यांना माझे वडील अशोक गेहलोत यांना लक्ष्य करायचे आहे, म्हणूनच त्यांनी मला समन्स पाठवले आहे. याबाबत आम्ही आधीच स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा ते मला चौकशीसाठी बोलावतील तेव्हा मी हजर राहीन, अशी प्रतिक्रिया वैभव गेहलोत यांनी दिली. 

 

Web Title: cm ashok gehlot attacks bjp and central govt after ed summons son vaibhav gehlot before rajasthan assembly election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.