अनोखे प्रकरण! हाताला 7-7 अन् पायाला 6-6 बोटं; 26 बोटांच्या मुलीचा जन्म; बघ्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 07:52 PM2023-09-17T19:52:29+5:302023-09-17T19:53:27+5:30
राजस्थानमधून हे अनोखे प्रकरण समोर आले आहे. चिमुकली निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राजस्थानच्या डीग जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील एक नवजात बाळ चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे हे बाळ 26 बोटं घेऊन जन्माला आले आहे. त्याच्या दोन्ही हाताला 7-7 आणि दोन्ही पायाना 6-6 बोटं आहेत. कुटुंबीय या नवजात कन्येला ढोलगड देवीचा अवतार मानत आहे. हे अनोखे बाळ पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमत आहे.
कामा शहरातील गोपीनाथ मोहल्ला येथे राहणाऱ्या गोपाल भट्टाचार्य यांची 8 महिन्यांची गर्भवती पत्नी सरजू देवी (25 वर्षे) हिला काल रात्री प्रसूती वेदना होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. गोपाल सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. पत्नीने मुलीला जन्म दिला तेव्हा काही काळ डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मुलीला 26 बोटं आहेत. यामुळे महिला आणि तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. हे कुटुंब कन्येला ढोलगड देवीचा अवतार मानत आहे.
ही एक अत्यंत दुर्मिळ केस आहे – डॉ. बी.एस. सोनी
कामा हॉस्पिटलचेडॉक्टर डॉ.बी.एस.सोनी यांनी सांगितले की, ही अत्यंत दुर्मिळ केस आहे. 26 बोटं असण्यात कोणत्याही प्रकारची हानी नाही. परंतु, अनुवांशिक विसंगतीमुळे हे घडते. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. या महिलेची ही दुसरी मुलगी आहे.