'त्यानं पत्नी गमावली..., ₹25 लाख नुकसान भरपाई द्या'; 12 वर्ष तुरुंगात राहिलेला पती निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 06:49 PM2023-09-30T18:49:47+5:302023-09-30T18:50:19+5:30
सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पत्नीच्या हत्येप्रकरणी एका आरोपी पतीला ठोठावण्यात आलेली जन्म ठेपेची शिक्षा चुकीची असल्याचे, राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने तब्बल 12 वर्षांनंतर संबंधित पतीची तुरुंगातून मुक्तता केली. एवढेच नाही, तर संबंधित आरोपी अर्जदाराला तीन महिन्यांच्या आत 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेशही राज्य सरकारला दिला आहे. याच बरोबर, कनिष्ठ न्यायालयाने संबंधित आरोपीला ठोठावलेला जन्मठेपेची शिक्षाही उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.
आरोपीच्या पतीने आत्महत्या केल्याचे पुराव्यावरून सिद्ध होते. यामुळे त्यांनी केवळ आपली पत्नीच गमावली नाही, तर सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायाधीश पंकज भंडारी आणि न्यायाधीस भुवन गोयल यांनी आरोपी इक्बाल यांचे अपील स्वीकारत हा आदेश दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित वकील राजेश गोस्वामी आणि निखिल शर्मा यांनी सांगितले की, 13 मे 2011 रोजी इकबालच्या पत्नीचा जळाल्याने मृत्यू झाला होता.
पोलिसांनी लावला होता पत्नीच्या हत्येचा आरोप -
पती इकबालनेच पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात सादर केले होते. ही घटना गलता गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. जयपूरच्या महिला अत्याचार प्रकरणाशीसंबंधित विशेष न्यायालयाने संबंधित आरोपीला पत्नीच्या हत्येत दोषी ठरवत 11 मे 2016 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होतीय