नवरा आयपीएस, आयएएस वधू; केली हेलिकॉप्टरने पाठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 11:16 AM2024-02-09T11:16:53+5:302024-02-09T11:18:05+5:30
अपराजिताचे वडील डॉ. अमर सिंह आणि आई डॉ. नीतन सिंग हे दोघेही सरकारी रुग्णालयात डॉक्टर होते.
राजस्थानच्या चुरू येथील आयपीएस देवेंद्र आणि भरतपूर येथील आयएएस अपराजिता यांच्या लग्नाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. केवळ १ रुपये आणि एक नारळ घेऊन हा विवाह पार पडला. मात्र या लग्नात वधूला हेलिकॉप्टरने निरोप देण्यात आला. यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.
अपराजिताचे वडील डॉ. अमर सिंह आणि आई डॉ. नीतन सिंग हे दोघेही सरकारी रुग्णालयात डॉक्टर होते. अपराजिता २०१९ मध्ये आयएएस झाली. मुलगी आयएएस झाल्यानंतर तिची लग्नानंतर पाठवणी हेलिकॉप्टरने करायची अशी अमर सिंह यांची इच्छा होती. त्यामुळे लग्नसोहळा पार पडताच अपराजिता आणि देवेंद्र यांना घेऊन वाहनांचा ताफा हेलिपॅडवर आला. त्यानंतर वधू, वराची हेलिकॉप्टरने पाठवणी करण्यात आली.
अपराजिता आंध्र प्रदेश केडरमध्ये काम केल्यानंतर उत्तर प्रदेश केडरमध्ये आल्या आहेत. सध्या त्या चांदोली येथे मुख्य विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. देवेंद्र कुमार यांची २०२१ मध्ये यूपीएससीमध्ये निवड झाली होती.