राजस्थानमध्ये ७ ठिकाणी महिलाच आमने-सामने; ही लढत सर्वांचे लक्ष वेधून घेतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 10:45 AM2023-11-09T10:45:26+5:302023-11-09T10:45:56+5:30

राजस्थानातील एकूण २०० मतदारसंघांपैकी ७ मतदारांसंघांमध्ये महिला उमेदवारांमध्येच लढत होणार आहे.

In Rajasthan, only women face each other in 7 places; This fight is attracting everyone's attention | राजस्थानमध्ये ७ ठिकाणी महिलाच आमने-सामने; ही लढत सर्वांचे लक्ष वेधून घेतेय

राजस्थानमध्ये ७ ठिकाणी महिलाच आमने-सामने; ही लढत सर्वांचे लक्ष वेधून घेतेय

जयपूर : राजस्थान विधानसभा निडणुकीच्या प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. कॉंग्रेस-भाजपसह अन्य पक्षही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राजस्थानमध्ये प्रामुख्याने कॉंग्रेस व भाजप लढत होत आहे. 
राजस्थानातील एकूण २०० मतदारसंघांपैकी ७ मतदारांसंघांमध्ये महिला उमेदवारांमध्येच लढत होणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी महिला आरक्षण नसतानाही ही लढत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिलांनी प्रचारात झोकून दिले आहे. 

सत्तांतराची परंपरा 
राजस्थानमध्ये मागील ३० वर्षांपासून दर ५ वर्षांनी विधानसभेत सत्तांतर होण्याची परंपरा आहे. पाच वर्षे कॉंग्रेसला तर पुढची पाच वर्षे भाजपला सत्ता मिळत आली आहे. ही परंपदा या खेपेला कायम राहणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते प्रचारात बदल होणार यावर भर देताना दिसत आहेत. 

मतदारसंघ    भाजप    कॉंग्रेस
कामा    नौक्षम चौधरी     जाहिदा खान
जायल    मंजू बाघमार     मंजू देवी मेघवाल
सादुलपूर     सुमित्रा पुनिया    कृष्णा पुनिया
हिंडोन     राजकुमारी जाटव    अनिता जाटव 
अनुपगड    संतोष बावरी    शिमला नायक
अजमेर (द)    अनिता भदेल    द्रौपदी कोली 
भोपालगढ    कमसा मेघवाल    गीता बरवड 
 

Web Title: In Rajasthan, only women face each other in 7 places; This fight is attracting everyone's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.