अपक्ष उमेदवारांचाच सुळसुळाट भारी; २०० जागांचे चित्र स्पष्ट, ‘आप’ केवळ ५८ जागांवर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:46 AM2023-11-12T09:46:12+5:302023-11-12T09:46:23+5:30

दिवाळीनंतर प्रचारसभा, रॅलींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

Independent candidates are the only candidates; The picture of 200 seats is clear, 'AAP' will contest in only 58 seats | अपक्ष उमेदवारांचाच सुळसुळाट भारी; २०० जागांचे चित्र स्पष्ट, ‘आप’ केवळ ५८ जागांवर लढणार

अपक्ष उमेदवारांचाच सुळसुळाट भारी; २०० जागांचे चित्र स्पष्ट, ‘आप’ केवळ ५८ जागांवर लढणार

जयपूर : विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या २०० जागांसाठी १,८७५ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी एकूण ९ राजकीय पक्ष निवडणूक लढवित आहेत. तर ७३० उमेदवार अपक्ष आहेत.  सर्व जागा लढविण्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पार्टीला तेवढे उमेदवारच मिळालेले नाहीत. पक्षाने केवळ ५८ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. दिवाळीनंतर प्रचारसभा, रॅलींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

सर्वाधिक उमेदवार या जिल्ह्यात

राजधानी जयपूरमध्ये १९ मतदारसंघात आहेत. तेथे एकूण १९९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठाेपाठ अलवर जिल्ह्यात ११ जागांवर ११३ उमेदवार आहेत. बहुतांश ठिकाणी भाजप आणि काॅंग्रेसमध्येच थेट लढत आहे.

Web Title: Independent candidates are the only candidates; The picture of 200 seats is clear, 'AAP' will contest in only 58 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.