'सोनिया गांधी नाही, वसुंधरा राजे मुख्यमंत्र्यांच्या नेत्या'; सचिन पायलटांचा गेहलोतांवर जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 01:43 PM2023-05-09T13:43:02+5:302023-05-09T13:43:18+5:30
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजस्थानचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजस्थानचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. गेहलोत यांचे नाव न घेता पायलट म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधरा राजे आहेत. सरकार वाचवण्यासाठी वसुंधरा राजे यांचे नाव घेतल्याने विरोधाभास निर्माण होतो. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच पायलट यांनीअजमेरहून पदयात्रेची घोषणाही केली.
पायलट यांनी मंगळवारी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोपही केले. हायकमांडने समिती स्थापन केली. राज्यसभा पोटनिवडणुकीत आम्ही सर्वांनी पक्षाला विजय मिळवून दिला. आम्ही शिस्त मोडली नाही. मला बेकार आणि देशद्रोही म्हटले. आम्हाला पक्षाचे नुकसान करायचे नव्हते. काँग्रेस आमदारांचा अपमान करण्यात आला. मुख्यमंत्री भाजप नेत्यांचे कौतुक करत आहेत, असंही पायलट म्हणाले.
राष्ट्रवादीला भाजपची 'B' टीम म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांचा खोचक टोला
यादरम्यान पायलट यांनी ११ मे पासून राजस्थान लोकसेवा आयोगाच्या अजमेर येथील कार्यालयापासून जयपूरपर्यंत जनसंघर्ष पदयात्रा काढण्याची घोषणा केली. ही पदयात्रा पाच दिवसांची असेल, असंही पाटलट म्हणाले. 'मी हताश आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. जनता हीच देव आहे, असंही पाटलट म्हणाले.