नरेंद्र मोदींच्या सभेला ड्युटीसाठी जाणाऱ्या ५ पोलिसांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, ३ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:46 PM2023-11-19T12:46:24+5:302023-11-19T12:46:56+5:30

या अपघातात तीन पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

nagaur car accident 5 policeman died in jhunjhunu | नरेंद्र मोदींच्या सभेला ड्युटीसाठी जाणाऱ्या ५ पोलिसांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, ३ जण जखमी

नरेंद्र मोदींच्या सभेला ड्युटीसाठी जाणाऱ्या ५ पोलिसांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, ३ जण जखमी

राजस्थानमध्ये भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना घडली. नागौर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात पाच पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिस कर्मचाऱ्यांची कार ट्रकला धडकली. भरधाव वेगाने कार जात होती, यावेळी कारने ट्रकला जोरदार धडक दिली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातात कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. हे सर्व पोलिस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जात होते. 

या अपघातात तीन पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी झुंझुनू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. नागैरी जिल्ह्यातील खिंवसर पोलिस ठाण्यात कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ड्युटीसाठी निघाले होते. दरम्यान कारचा भीषण अपघात झाला. नागौर जिल्ह्यातील कनुता गावाजवळ हा भीषण अपघात झाला. 

या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तीन जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडकलेल्या पोलिसांच्या मृतांना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बराच वेळ वाहतूक सेवा विस्कळीत होती. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सेवा सुरळीत केली आहे.

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी तारानगरहून विशेष हेलिकॉप्टरने झुंझुनूला पोहोचतील. तत्पूर्वी, राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धनखर यांनीही झुंझुनू येथे पोहोचून पंतप्रधान मोदींच्या सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला. सध्या जिल्ह्यातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी येथे हजर आहेत, त्यात अतिरिक्त एसपी, डीएसपी आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: nagaur car accident 5 policeman died in jhunjhunu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.