आता देशाला मिळणार सोनंच सोनं! राजस्थान होणार मालामाल; या शहरात सापडलाय मोठा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 13:38 IST2024-06-25T13:37:03+5:302024-06-25T13:38:38+5:30
सरकारकडून करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि जगपुरा वाटप करण्यात आले आहे. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होती...

आता देशाला मिळणार सोनंच सोनं! राजस्थान होणार मालामाल; या शहरात सापडलाय मोठा खजिना
राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खानीतून आता लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली आहे. महत्वाचे म्हणजे, ही खान आगामी काळात देशाच्या 25% सोन्याचा पुरवठा करू शकते. अर्थात आता राजस्थानातील बाडमेर गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाईल.
सरकारकडून करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि जगपुरा वाटप करण्यात आले आहे. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. यांपैकी दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला परवाना मिळाला आहे.
तर इतर ब्लॉक कांकरिया गारा गोल्डच्या कंपोझिट परवान्यासाठी 5 कंपन्या रेसमध्ये आहेत. यात मुंबईची पोद्दार डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, अहमदाबादची हीराकुंड नेच्युरल रिसोर्सेस लिमिटेड, रतलामची ओवेस मेटल अँड मिनरल्स प्रोसेसिंग लिमिटेड, उदयपूरची हिंदुस्तान झिंक आणि कानपूरच्या जेके सीमेंट लिमिटेडचा समावेश आहे.
या सोन्याच्या खानीतून इतरही अनेक खनिजे काढले जातील. यामुळे या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महत्वाचे म्हणजे, या भागात 940.26 हेक्टरमध्ये 113.2 मिलियन टन सुवर्ण भांडार सुरुवातीच्या टप्प्यात सापडू शकतो. यात जवळफास 222.39 टन सुवर्ण धातू असण्याची शक्यता आहे.