पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:58 AM2023-09-12T11:58:47+5:302023-09-12T11:59:34+5:30

भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या संदर्भात जनरल व्हीके सिंह राजस्थानमध्ये पोहोचले आहेत.

pok will merge with india its own in some time- Union Minister VK Singh | पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह

पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह

googlenewsNext

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह (निवृत्त) यांनी केले आहे. दरम्यान, राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान, त्यांना विचारण्यात आले की पीओकेमधील लोक भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत. या मुद्द्यावर भाजपची भूमिका काय आहे? यावर उत्तर देताना व्हीके सिंह यांनी पीओकेच्या भारतात विलीनीकरणाबाबत भाष्य केले.

यावर्षी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या संदर्भात जनरल व्हीके सिंह राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. राजस्थानमधील दौसा येथे पत्रकार परिषदेत भाजप खासदार आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह यांना विचारण्यात आले की, पीओकेचे शिया मुस्लिम भारतासोबतची सीमा उघडण्याबाबत बोलत आहेत का? यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर व्हीके सिंह म्हणाले, "पीओके आपोआप भारतात विलीन होईल. तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल." 

व्हीके सिंह यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या G20 शिखर परिषदेबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, भारतात ज्या प्रकारे G20 चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारताने जगात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तसेच, G20 सारखा कार्यक्रम यापूर्वी आयोजित केला गेला नव्हता आणि कोणत्याही देशाने विचारही केला नसेल की, भारत अशी परिषद आयोजित करू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपले कर्तृत्व सिद्ध केले आह, असेही व्हीके सिंह म्हणाले.

पीओकेमध्ये पाकिस्तानच्या विरोधात आहेत लोक
काश्मिरी कार्यकर्ते शब्बीर चौधरीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात पाकिस्तानविरोधी निदर्शने होत आहेत. पीओकेमधील शहरे आणि गावांमधील लोक अन्न टंचाई, गगनाला भिडणारी महागाई आणि उच्च करांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. जम्मू-काश्मीरचे कार्यकर्ते शब्बीर चौधरी यांनी सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. संपूर्ण प्रदेशात होत असलेल्या मोठ्या निषेधासाठी त्यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.

Web Title: pok will merge with india its own in some time- Union Minister VK Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.