गेहलोत भाषण देण्यासाठी उभे राहिले आन् सुरू झाल्या मोदी-मोदी घोषणा; तेव्हा मोदींनी काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 03:31 PM2023-05-10T15:31:45+5:302023-05-10T15:32:33+5:30
यावेळी मुख्यमंत्री गेहलोत भाषणासाठी उभे राहिले असता, त्यांना पुन्हा एकदा 'मोदी-मोदी' घोषणांना सामना करावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजस्थानला तब्बल 5500 कोटी रुपयांची भेट दिली. नाथद्वारा येथे नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह विविध प्रोजेक्ट्सचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत भाषणासाठी उभे राहिले असता, त्यांना पुन्हा एकदा 'मोदी-मोदी' घोषणांना सामना करावा लागला. यावेळी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी हातवारे करत लोकांना शांत होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी राजस्थानातील नाथद्वार येथे पोहोचले असता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. श्रीनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर, पीएम नरेंद्र मोदी यांनी तब्बल 5,500 कोटी रुपयांहूनही अधिकच्या 4 राष्ट्रीय महामार्गांचे आणि 3 रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली.
यावेळी बोलताना गेहलोत म्हणाले, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. आज पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करतील, याचा मला अत्यंत आनंद आहे. आपण पूर्वी गुजरातसोबत स्पर्धा करत होतो. आपल्याला वाटत होते की, आपण मागे पडत आहोत. मात्र आता आपण पुढे गेलो आहोत. गेहलोतांचे संपूर्ण भषण होईपर्यंत मोदी-मोदी अशा घोषणा होत होत्या, पण ते अस्वस्थ झाले नाही.
महत्वाचे म्हणजे, अशोक गेहलोत खुर्चीवरून उठताच मोदी-मोदी अशा घोषणा सुरू झाल्या. मात्र, पंतप्रधान मोदींना हे आवडले नाही. ते सातत्याने लोकांना शांत होण्याचे आवाहन करत होते. गेहलोत यांना यापूर्वीही, आयपीएल सामना बघायला गेले असता, अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला होता.