राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटद्वारे दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 04:14 PM2024-03-06T16:14:35+5:302024-03-06T16:15:34+5:30
CM Bhajan Lal Sharma Corona Positive : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून भजनलाल शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
CM Bhajan Lal Sharma Corona Positive : (Marathi News) राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांना कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून भजनलाल शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
आरोग्याच्या समस्येमुळे आज माझी आरोग्य तपासणी केली. त्यानंतर माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे भजनलाल शर्मा यांनी म्हटले आहे. पुढे भजनलाल शर्मा म्हणाले, " "मी सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पूर्णपणे पालन करत आहे. आगामी सर्व कार्यक्रमांमध्ये व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी होणार आहे."
स्वास्थ्य समस्या के चलते आज स्वास्थ्य परीक्षण करवाने पर आज मेरी कोविड रिपोर्ट पॉजिटिव आई है।
— Bhajanlal Sharma (Modi Ka Parivar) (@BhajanlalBjp) March 6, 2024
मैं सेल्फ आइसोलेशन में हूं और चिकित्सकों के परामर्श का पूर्णतः पालन कर रहा हूं एवं आगामी सभी कार्यक्रमों में वर्चुअल माध्यम से सम्मिलित रहूंगा।
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना जेव्हा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजली, तेव्हा त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. अशोक गेहलोत म्हणाले, "मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना कोविड पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळाली. मी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो."
मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा के कोविड पॉजिटिव होने की सूचना मिली। मैं उनके जल्द स्वास्थ्य लाभ की कामना करता हूं।@BhajanlalBjp
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) March 6, 2024
कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी
कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कृषी संशोधन केंद्र दुर्गापुरा येथे आयोजित शक्ती वंदन अभियानाच्या समारोप कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले होते. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी उपस्थित महिला शक्तीला अक्षरश: संबोधित केले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्ती वंदन कार्यक्रमाला संबोधित केले.