Dushyant Singh : वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 03:47 PM2023-12-08T15:47:52+5:302023-12-08T15:49:01+5:30

या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना मैदानात यावे लागले आणि तसे काहीही नसल्याचे स्पष्ट करावे लागले. 

rajasthan cm face bjp mla father claim on vasundhara raje son dushyant singh to kept mla-in resort | Dushyant Singh : वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर...

Dushyant Singh : वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर...

राजस्थानमधील राजकीय पेच काही संपताना दिसत नाही. मुख्यमंत्रिपदावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे मुख्यमंत्री पदाचे सर्वच दावेदार आपापल्या परीने वातावरण तयार करत आहेत, तर दुसरीकडे भाजपने एकाही नावावर अद्याप निर्णय घेतला नाही. दरम्यान, गुरुवारी राजस्थानमध्ये एका भाजप आमदाराच्या वडिलांनी वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत यांच्यावर पाच आमदारांना जबरदस्तीने एका रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना मैदानात यावे लागले आणि तसे काहीही नसल्याचे स्पष्ट करावे लागले. 

दुसरीकडे, कोणत्याही किंमतीत पक्षाच्या विरोधात जाणार नाही, असे वसुंधरा राजे यांनीही म्हटले. तसेच, त्यांनी मुलावरील आरोपांबाबत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान, वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांच्यावर पाच आमदारांना बळजबरीने रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप करणारे बाहेरच्या पक्षातील नाहीत. तर ते यापूर्वी भाजपचे आमदार राहिले आहेत. हेमराज मीणा असे त्यांचे नाव असून ते आमदार ललित मीणा यांचे वडील आहेत.

कोण पाच आमदार?
1. कंवरलाल (अंता, बरण)
कंवरलाल मीणा अंता विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रमोद जैन यांचा पराभव केला आहे. 2018 मध्ये त्याचा पराभव झाला होता.

2. राधेश्याम बैरवा (बारां अटरू, बारा)
राधेश्याम बैरवा हे व्यवसायाने ट्रेलर आहेत. यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली होती. सामान्य जीवन जगणारे बैरवा हे जिल्ह्याचे मंत्री आहेत आणि त्यांची पत्नी नगरसेवक आहे.

3. काळुराम मेघवाल (डग, झालावाड)
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या डग विधानसभेतून यंदाच्या निवडणुकीत भाजपचे काळूराम मेघवाल यांनी काँग्रेसचे चेतराज गेहलोत यांचा पराभव केला होता. 2018 मध्येही ते जिंकले होते.

4. गोविंद प्रसाद (मनोहर थाना, झालावाड)
भाजपचे गोविंद प्रसाद यांनी मनोहर थाना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार कैलाश चंद यांचा पराभव केला. गोविंद प्रसाद यांना 85304 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार कैलाश चंद यांना 60439 मते मिळाली. 2018 च्या निवडणूक लढतीत ही जागा भाजपचे उमेदवार गोविंद प्रसाद यांनी जिंकली होती.

5. ललित मीना (किशनगंज)
ललित मीणा हे किशनगंजचे आमदार आहेत. ललित मीणा यांचे वडील हेमराज मीणा हे देखील आमदार राहिले होते. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या निर्मला सहारिया यांचा पराभव केला. ललित यांना 84155 मते मिळाली, तर काँग्रेसच्या निर्मला यांना 65868  मते मिळाली.

काय आहे आरोप?
किशनगंजचे भाजप आमदार ललित मीणा यांचे वडील हेमराज मीणा यांनी आरोप केला आहे. "4 डिसेंबरला दुष्यंत यांनी वसुंधरा यांना भेटण्याच्या नावाखाली ललित यांना घेऊन गेले, पण भेटीनंतर त्यांना जयपूरच्या बाहेरील रिसॉर्टमध्ये ठेवले. वसुंधरा यांच्या भेटीनंतर ललित यांना पक्ष कार्यालयात जायचे होते, पण त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात आले", असे हेमराज मीणा म्हणाले. तसेच, ललित यांना घेण्यासाठी रिसॉर्टमध्ये पोहोचलो पण काही लोकांनी मलाही अडवले. तेथे 5-10 लोक होते ज्यांनी सांगितले की ते मला आत जाऊ देणार नाहीत, परंतु माझ्यासोबत 10-15 लोक होते म्हणून मी माझ्या मुलाला परत आणण्यात यशस्वी झालो. झालावाड आणि बारण जिल्ह्यातील आणखी पाच आमदार देखील येथे होते, असेही हेमराज मीणा म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणी कंवरलाल यांनी सांगितले की, दुष्यंत सिंह यांचे नाव खराब करण्याचा हा कट आहे. विजयानंतर आम्ही रॅली काढली आणि जयपूरला पोहोचलो. तिथल्या एका रिसॉर्टमध्ये थांबलो. उर्वरित आमदारांनीही आपल्या मर्जीने या रिसॉर्टमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. 5 डिसेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास 30-40 लोक रिसॉर्टमध्ये येऊन ललित यांच्याबद्दल विचारत होते. त्यामुळे मी त्यांना ओळखत नसल्याने आधी थांबवले. त्यानंतर ललित यांच्या वडिलांना पाहून मी त्यांना जाऊ दिले, असे कंवरलाल म्हणाले.

वसुंधरा यांनी काय स्पष्टीकरण दिले?
आमदारांना जबरदस्तीने रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा मुलगा दुष्यंत सिंह यांच्यावरील आरोपांवर वसुंधरा राजे म्हणतात की, असे आरोप करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आरोप निराधार आहेत.

Web Title: rajasthan cm face bjp mla father claim on vasundhara raje son dushyant singh to kept mla-in resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.