कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलणार नाही; मोदींनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:25 AM2024-04-13T06:25:09+5:302024-04-13T06:25:54+5:30
राज्यघटना आमच्यासाठी गीता, कुराण, बायबल : पंतप्रधान
जितू प्रधान/ सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क
बाडमेर/उधमपूर : विरोधी पक्ष राज्यघटनेच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवत आहेत. कोणत्याही स्थितीत देशाची राज्यघटना बदलणार नाही. आपल्या देशासाठी राज्यघटना म्हणजेच गीता, कुराण, बायबल असे सर्व काही आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
राजस्थानमधील बाडमेर येथे शुक्रवारी प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, एससी, एसटी यांचे नाव घेऊन भेदभाव करणाऱ्या काँग्रेसने आता राज्यघटनेचा उल्लेख करून दिशाभूल सुरू केली आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत हरविले होते. त्यांना भारतरत्न हा किताब मिळू दिला नाही. याच काँग्रेसने देशात आणिबाणी लादली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका घेण्यात येतील व या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा पुन्हा देण्यात येईल, असे आश्वासन मोदी यांनी दिले.
काँग्रेसची राष्ट्रविरोधी शक्तींशी हातमिळवणी
राष्ट्रविरोधी शक्तींशी काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. इंडिया आघाडी भारताला दुबळे बनविण्याचे काम करीत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील बारमेर येथे शुक्रवारी प्रचारसभेत केला.
ते म्हणाले की, काँग्रेसची विचारसरणी विकासविरोधी आहे. देशाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांचा काँग्रेसने कधीही विकास केला नाही. कोणतीही समस्या त्यांनी सोडविली नाही.
काँग्रेसने अनैतिक मुलाप्रमाणे
कलम ३७० चे लाड केले
nमुरादाबाद (उत्तर प्रदेश) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी काँग्रेसवर काश्मीर प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल हल्ला चढवला. शाह म्हणाले की, काँग्रेसने अनेक दशकांपासून “अवैध मुला” प्रमाणे कलम ३७० चे “लाड” केले.
nसभेत शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली. “मला सांगा, काश्मीर आपला नाही का? काँग्रेसचे खरगे हे विचारतात की, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या लोकांचा काश्मीरशी काय संबंध आहे? मी सांगतो मुरादाबादचे प्रत्येक मूल काश्मीरसाठी जीव द्यायला तयार आहे.
nआज आपला तिरंगा तिथे अभिमानाने फडकत आहे, असे शाह म्हणाले.