Video: चिठ्ठीत भजनलाल शर्मांचे नाव वाचून वसुंधरा राजेंना धक्का; कॅमेऱ्याने टिपले हावभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 21:30 IST2023-12-12T21:30:16+5:302023-12-12T21:30:56+5:30
Vasundhara Raje Video: भाजप हायकमांडने वसुंधरा राजे यांना डावलून पहिल्यांदा आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले आहे.

Video: चिठ्ठीत भजनलाल शर्मांचे नाव वाचून वसुंधरा राजेंना धक्का; कॅमेऱ्याने टिपले हावभाव
Rajasthan New CM Bhajanlal Sharma: आज अखेर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपने प्रस्थापितांना डावलून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले. जयपूर येथील भाजप कार्यालयात पक्षाच्या बैठकीनंतर शर्मांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत निरीक्षक राजनाथ सिंह यांच्यासह वसुंधरा राजे आणि इतर ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणे राजस्थानमध्येही नवीन चेहऱ्याला संधी दिली. हा वसुंधरा राजे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, व्यासपीठावर राजे यांनी चिठ्ठीमध्ये भजनलाल यांचे नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले.
3 डिसेंबर रोजी निकाल आल्यापासून वसुंधरा राजे यांनी आपली ताकद दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 4 आणि 5 डिसेंबर रोजी त्यांनी जयपूरमध्ये त्यांच्या निकटवर्तीय आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर दिल्लीला पोहोचून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. दिल्लीहून परतल्यानंतरही वसुंधरा राजे यांनी जयपूरमध्ये आमदारांची भेट घेतली. रिपोर्ट्सनुसार, भाजपने वसुंधरा राजे यांना विधानसभा अध्यक्ष बनण्याचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी नकार दिला.
अक्कड़ बक्कड़ बंबे बो... pic.twitter.com/i6wwy3YNuv
— Srinivas BV (@srinivasiyc) December 12, 2023
विरोधकांचा टोमणा
दरम्यान, वसुंधरा राजे यांच्या प्रतिक्रियेवर विरोधी पक्षाने टोला लगावला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी X वर व्हिडिओ शेअर करत लिहिले, "अक्कड बक्कड बंबे बो..." याशिवाय, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, माजी मुख्यमंत्र्यांसाठी हा धक्कादायक क्षण होता.