Video : असा मृत्यू तुम्ही कधीच पाहिला नसेल...! डान्स करताना जनरेटरमध्ये अडकली महिला, डोकं फुटलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:37 AM2024-08-29T11:37:13+5:302024-08-29T11:38:31+5:30

संबंधित महिला जनरेटरजवळ डान्स करत होती...

Video You have never seen such a death Woman stuck in generator while dancing | Video : असा मृत्यू तुम्ही कधीच पाहिला नसेल...! डान्स करताना जनरेटरमध्ये अडकली महिला, डोकं फुटलं अन्...

Video : असा मृत्यू तुम्ही कधीच पाहिला नसेल...! डान्स करताना जनरेटरमध्ये अडकली महिला, डोकं फुटलं अन्...

राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे जनरेटरमध्ये अडकल्याने एक महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिला जनरेटरजवळ डान्स करत होती. ती गावातील काही लोकांसोबत भगवान श्रकृष्णांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तलावाकडे जात असताना हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेनंतर घठनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाली.

डान्स करताना नेमकं काय घडलं? -
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कुंडल गावची रहिवासी होती माफी देवी असे तिचे नाव होते. जन्माष्टमीनिमित्त गावातील इतर महिलांसह त्या श्रीकृष्णांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तलावाकडे जात होत्या. यावेळी महिला गाण्याच्या तालावर डान्स करत होत्या. डान्स करतानाच माफी देवी जनरेटरमध्ये अडकल्या.

जनरेटरमध्ये ओढळी अडकली अन्...
डान्स करताना माफी देवी यांची ओढणी जनरेटरमध्ये अडकली होती. या घटनेत त्यांचे डोके फुटले. यानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड सुरू झाली. घटनेनंतर, जनरेटर वाला फरार झाल्याचे बोलले जात आहे.

बघा व्हिडिओ - 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आल्यानंतर, पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी माफी देवी यांना रुग्णालयात पाठवले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
 

Web Title: Video You have never seen such a death Woman stuck in generator while dancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.