गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:10 AM2023-11-20T08:10:48+5:302023-11-20T08:11:05+5:30

पंजाबमधून येणारे पाणी पाकमध्ये वळविल्याचा आक्षेप; उमेदवारही देताहेत पाणी देण्याचे आश्वासन

Water share in the Ganges canal became a key issue | गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा

गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेल्या प्रमुख मुद्द्यांपैकी श्री गंगा कालव्याचा विषय आघाडीवर आहे. या कालव्याच्या माध्यमातून पाण्याचे होणारे असमान वितरण हे शेतकरी मतदारांमध्ये प्रमुख मुद्दा आहे. येथील राज्यकर्त्यांनी पंजाबमधून येणारे पाणी पाकिस्तानकडे वळवल्याचा आरोप केला आहे.  

राजस्थानच्या ग्रामीण किसान मजदूर समितीचे प्रमुख रणजित सिंह राजू म्हणाले की, महाराजा गंगा सिंह यांनी कालव्याची निर्मिती केली, तेव्हा पंजाब आणि राजस्थानमध्ये पाण्याचे समान वितरणाकडे लक्ष दिले. कालांतराने राज्यात सत्तांतरे होत गेली, तशी कालव्याच्या पुनर्निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाला आणि आता पाण्याचे वितरण असमान होत आहे. त्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आगामी सरकारने पाण्यासाठी काम करावे, असे मतदारांनी म्हटले.

पाण्यासाठी आंदोलन; ३ दिवस रास्ता रोको

nअनेकदा कालवा बंद केला जातो. राजस्थान सरकारने या संदर्भात लक्ष घालून पाण्याच्या समान वितरणासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. 

nसप्टेंबर महिन्यात १० हजार शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तीन दिवस रास्ता रोको करत तसेच ‘गंगनहर’ शहराचे सर्व प्रवेशद्वार बंद ठेवले होते.

२,५०० क्युसेक
पाणी दररोज गंगा कालव्यातून   मिळावे, अशी मागणी जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

सर्व पक्षांकडून आश्वासन
शेतकऱ्यांसह स्थानिक मतदारांच्या मागणीचा विचार करता, यंदाच्या निवडणुकीत गंगा कालव्यातील पाण्याच्या समान वितरणासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन ‘गंगनहर’ मतदारसंघातील कॉंग्रेस, भाजप तसेच अपक्ष उमेदवारांनी दिले.

Web Title: Water share in the Ganges canal became a key issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.