मेष राशिभविष्य 2021: विदेशात जाण्याच्या इच्छापूर्तीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 01:20 PM2020-12-17T13:20:35+5:302020-12-17T17:17:50+5:30

Aries Horoscope 2021: मेष राशीच्या जातकांसाठी २०२१ चे मधले काही दिवस जेव्हा काही ग्रह वक्री होऊन आपल्या कार्यात विघ्न निर्माण करतील तेव्हा ते आव्हानात्मक ठरतील.

Aries Horoscope 2021 in Marathi, Career, Education, Love, Relationship and Health Horoscope, Mesh Rashi Bhavishya 2021 | मेष राशिभविष्य 2021: विदेशात जाण्याच्या इच्छापूर्तीची शक्यता

मेष राशिभविष्य 2021: विदेशात जाण्याच्या इच्छापूर्तीची शक्यता

googlenewsNext

मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२१ हे वर्ष अत्यंत आशादायी असणार आहे. आपल्या बहुतांश योजना आकारास येतील, ज्यात ह्या वर्षी आपणास आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळून आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांचे संपूर्ण लक्ष आपल्या कामावर असल्याने त्यांच्या क्षेत्रात त्यांना चांगले पद मिळण्याची शक्यता आहे. ह्या वर्षी आपण आपल्या नेतृत्व क्षमतेचा कौशल्यपूर्वक वापर कराल व त्याचे फळ म्हणून आपणास आपल्या सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. मित्रांच्या सहयोगाने आपले जीवन उंचावण्यास मदतच होईल. ह्या व्यतिरिक्त वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. मेष राशीच्या जातकांसाठी २०२१ चे मधले काही दिवस जेव्हा काही ग्रह वक्री होऊन आपल्या कार्यात विघ्न निर्माण करतील तेव्हा ते आव्हानात्मक ठरतील. ह्या दरम्यान आपणास परिश्रम वाढवावे लागतील. इतकेच नव्हे तर आपणास धीर सुद्धा धरावा लागेल. आहारातील असंतुलनामुळे आरोग्य विषयक त्रास होण्याची शक्यता असून आरोग्याविषयी आपणास जागरूक राहावे लागेल. ह्या वर्षी काही लोकांची परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांना अत्यंत आनंद होईल. २०२१ च्या सुरवातीस मेष राशीच्या व्यक्तींना आधुनिक संवादाच्या माध्यमातून चांगल्या बातम्या मिळतील. नशिबाची साथ मिळाल्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यात यशस्वी होऊ शकाल. काही लोकांना वर्षाच्या मध्यास स्थानांतर करण्याची संधी मिळेल, जी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. ह्या वर्षी कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता असून त्यांची आपणास काळजी घ्यावी लागेल व आपल्या दैनंदिन कार्यक्रमातून त्यांच्यासाठी वेळ सुद्धा काढावा लागेल. पैशांच्या मागे लागल्याने काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असून पैसा व कुटुंब ह्यात समतोल साधणे हितावह ठरेल. ह्या वर्षी आपणास काही स्थावर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींचे अजून घर झाले नसेल त्यांना विशेष स्वरूपात संपत्तीशी संबंधित लाभ होण्याची दाट शक्यता असून त्यासाठी आपणास खूपच प्रयत्नशील राहावे लागेल. लहान भावंडांच्या सहकार्याने सुद्धा आपणास मोठा फायदा होईल.  

वैवाहिक जीवन (Arise, Love and relationship Horoscope 2021)

मेष राशींच्या व्यक्तींसाठी वैवाहिक जीवनासाठी २०२१ ची सुरवात ही खूपच चांगली होत आहे. आपण आपल्या मधुर वाणीने जोडीदाराचे हृदय जिंकण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराच्या सहवासात राहण्याच्या व हिंडण्या - फिरण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील व त्यामुळे आपले वैवाहिक जीवन खुलून उठेल. असे असले तरी २०२१ चे मधले काही दिवस आव्हानात्मक असल्याने त्या दरम्यान वैवाहिक जीवनात थोडी काळजी घ्यावी लागेल. ह्या कालखंडात आपण व जोडीदारादरम्यान काही कारणाने मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी आपण जर थोडे संयमित राहिलात तर संभाव्य कटुता टाळू शकाल. विवाहितांसाठी वर्षाची सुरवात मध्यम फलदायी असून नात्यात थोडा तणाव निर्माण होईल. असे असले तरी मार्च २०२१ नंतर परिस्थितीत सुधारणा होऊन आपले संबंध अधिक दृढ होऊ लागतील. आपल्या जोडीदाराशी सलोखा राखण्यासाठी कुटुंबीयांच्या सहकार्याची सुद्धा गरज भासेल. २०२१ चा अखेरचा महिना मेष राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंधांसाठी अनुकूल आहे. मेष राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा!  

आर्थिक (Arise, Finance Horoscope 2021)

२०२१ च्या सुरुवातीपासूनच मेष राशीच्या जातकांना निधीची कमतरता जाणवणार नाही. असे असले तरी आपल्याला अव्यावहारिक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा आपली आर्थिक बाजू कोलमडू शकते. एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ च्या दरम्यान आपणास विशेष असा धनलाभ होऊन आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. ऑगस्ट २०२१ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान आपणास निधीची कमतरता जाणवण्याच्या शक्यतेमुळे खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान एखाद्या विशेष कार्यासाठी आपणास कर्ज काढावे लागण्याची शक्यता असून ते फेडण्यास बराच अवधी लागेल. वर्षाचे अखेरचे महिने चांगले आहेत. एकंदरीत विचार करता असे दिसते, की मेष राशीच्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष पैसे व निधीच्या बाबतीत सरासरीहून उत्तम असेल. 

नोकरी, व्यवसाय, करिअर (Arise, Job-Career-Business Horoscope 2021)

 नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाची सुरुवात दणक्यात होईल. आपण मन लावून कामे कराल व त्यामुळे आपली गणना संस्थेच्या आधारस्तंभात होऊ शकेल. आपल्या कामाची प्रशंसा होऊन व विचारसरणीने प्रभावित होऊन आपणास एखादे महत्वाचे पद देण्यात येऊ शकते. असे असले तरी वायफळ गोष्टीत आपला वेळ घालवून आपणास वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागू नये, म्हणून एप्रिल ते ऑगस्ट महिन्यादरम्यान आपणास कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल. ह्या नंतरचे दिवस नोकरीसाठी उत्तम आहेत. व्यापाराच्या दृष्टीने वर्षाची सुरवात काहीशी कमकुवत असेल. आपणास काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, मात्र फेब्रुवारी ते डिसेंबर पर्यंतचा कालखंड सामान्यतः चांगले परिणाम मिळवून देणारा आहे. वर्षाच्या मध्यास विदेशी संपर्कातून सुद्धा चांगला लाभ होईल.  

शिक्षण (Arise, Education Horoscope 2021)

२०२१ ची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी चांगली होऊन त्यांना शिक्षणाशी संबंधित बाबीत चांगले परिणाम मिळतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छापूर्ती होऊन आवडत्या विषयांचे शिक्षण घेण्याची संधी मिळेल. मार्च ते एप्रिल २०२१ दरम्यान शिक्षणात विशेष श्रेणी मिळविण्याची संधी मिळेल. ह्याच दरम्यान काही जातक शिक्षणासाठी परदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकतील. मे - जून २०२१ दरम्यान मेष राशीच्या विद्यार्थ्यांची शिक्षणात उन्नती होऊ शकेल. आपणास शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता असल्याने संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित करावे. ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२१ अभ्यासाच्या दृष्टीने काहीसे त्रासदायी ठरतील. ह्या दरम्यान इतर प्रवृतींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करून आपल्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे. शिक्षणाच्या दृष्टीने मेष राशीच्या विद्यार्थ्यांना वर्षाचा शेवटचा महिना जास्त अनुकूल आहे. 

आरोग्य  (Arise, Health Horoscope 2021)

२०२१ ह्या वर्षाची सुरुवात मेष राशीच्या जातकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने काहीशी  नाजूकच होईल. ह्या दरम्यान आहारातील असमोतलपणा आपले आरोग्य कमकुवत करण्यास कारणीभूत ठरेल. फेब्रुवारी २०२१ पासून आरोग्यात सुधारणा होऊन बऱ्याच प्रमाणात आपली तंदुरुस्ती सुदृढ होऊ लागेल. आपणास अपचन, उष्णतेचे विकार इत्यादी होण्याची शक्यता असल्याने आपणास  विशेषतः तेलकट व मसालेदार पदार्थांचे प्रमाण आहारातून कमी करावे लागेल. वर्षाच्या मध्यास आपण शारीरिक व्यायामावर अधिक भर द्याल. योगासन व व्यायाम करून आपण स्वतः तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न कराल व त्यात आपणास सकारात्मक परिणाम सुद्धा मिळेल. जुलै ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत आपणास कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो, ज्यातून नोव्हेंबर महिन्या दरम्यान आपली सुटका होऊ शकेल. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना २०२१ च्या वर्षातील अखेरचे दोन महिने चांगले जातील.
 

Web Title: Aries Horoscope 2021 in Marathi, Career, Education, Love, Relationship and Health Horoscope, Mesh Rashi Bhavishya 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.