मिथुन राशिभविष्य 2021: प्रगतीसाठी स्वयंप्रेरित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 02:52 PM2020-12-17T14:52:25+5:302020-12-17T14:54:10+5:30

Gemini horoscope 2021: २०२१ दरम्यान आपल्या प्राप्तीत वृद्धी होणार असल्याने आपली आर्थिक स्थिती हळू हळू सुदृढ होईल. ह्याच कारणांमुळे आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवून वाढीव प्राप्तीचा समतोल साधावा लागेल.

Gemini horoscope 2021: Gemini Horoscope 2021 in Marathi, Career, Education, Love, Relationship and Health Horoscope, Mithun Rashi Bhavishya 2021 | मिथुन राशिभविष्य 2021: प्रगतीसाठी स्वयंप्रेरित व्हाल

मिथुन राशिभविष्य 2021: प्रगतीसाठी स्वयंप्रेरित व्हाल

googlenewsNext

मिथुन राशीच्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष मध्यम फलदायी आहे. ह्या वर्षी आपल्या खर्चात अनियमितता येऊन त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या आर्थिक स्थितीवर होण्याच्या शक्यतेमुळे आपणास आपल्या गंगाजळीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपणास खर्चात कपात करावी लागेल. प्रकृतीच्या दृष्टीने २०२१ हे वर्ष काहीसे त्रासदायी ठरणारे असल्याने आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहून आपणास रोज नियमितपणे व्यायाम व योगासने ह्यांचा आधार घेऊन स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. हे वर्ष आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. काही आव्हानां व्यतिरिक्त २०२१ दरम्यान आपल्या प्राप्तीत वृद्धी होणार असल्याने आपली आर्थिक स्थिती हळू हळू सुदृढ होईल. ह्याच कारणांमुळे आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवून वाढीव प्राप्तीचा समतोल साधावा लागेल. आपण जर एखाद्या स्पर्धेत सहभागी होणार असलात तर कठोर परिश्रम करूनच आपणास यश प्राप्त होईल. ह्या वर्षी आपल्या आयुष्यात घडणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपणास आयुष्यात प्रगती साधावयाची असल्याचा मनातील ठाम निर्धार हि होय. निव्वळ त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढून समोर येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करून आपण त्यात यशस्वी व्हाल. आपली कुशाग्र बुद्धी व तीव्रताच आपल्या सुस्थितीस कारणीभूत ठरणारी असल्याने स्वतःवर जास्त विश्वास ठेवून इतरांवर अवलंबून राहण्याची संवय आपणास सोडून द्यावी लागेल. आरोग्याची काळजी जितकी जास्त घ्याल तितके आरोग्य सुदृढ राहील.

वैवाहिक जीवन (Gemini,Love and relationship Horoscope 2021)

मिथुन राशीच्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष प्रेम व संबंध ह्यांच्या बाबतीत अनुकूल आहे. असे असले तरी वैवाहिक जीवनात जोडीदाराशी संबंधात चढ - उतार येतच राहतील. आपल्या वैवाहिक जीवनात आपणास अनेक चांगले अनुभव येतील व आपल्या जोडीदारास खुश ठेवण्यासाठी आपण खूप प्रयत्न कराल. त्यांच्या कडून पुढाकार घेतला गेल्याने आपले संबंध दृढ होतील. विशेषतः वर्षाच्या मध्यास आपल्या प्रेमी जीवनास बहर येऊन आपल्यातील जवळीक सुद्धा वाढेल. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास २०२१ ह्या वर्षात मिथुन राशीचे जातक एकमेकांना उत्तम प्रकारे समजू शकतील. आपण जर विवाहित असाल तर वर्षाच्या सुरवातीस आपला जोडीदार कुटुंबाकडे अधिक लक्ष देऊ लागल्याने आपल्यात काहीसा दुरावा निर्माण होऊ शकतो व त्यामुळे वैवाहिक जीवन वर्षाच्या सुरवातीस मनानुसार असणार नाही. अर्थात ही स्थिती फार काळ टिकणार नसून आपणास अपेक्षित असे वैवाहिक जीवन उपभोगता येईल. वैवाहिक जीवनासाठी वर्षाचे मधले व अखेरचे महिने उत्कृष्ट असतील.

१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा! 

आर्थिक (Gemini,Finance Horoscope 2021)

मिथुन जातकांना ह्या वर्षी पैसा व निधी ह्यांची विशेष कमतरता भासणार नाही. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. खर्चात सतत वाढ होत राहिल्याने  वर्षाच्या सुरवातीच्या काही महिन्यात आर्थिक स्थिती काहीशी नाजूक असेल. ह्याचा प्रभाव आपल्या आर्थिक जीवनावर झाला तरी एप्रिल ते २१ जुलै दरम्यान अनेक प्रकारे आर्थिक लाभ मिळून आपली आर्थिक स्थिती पुन्हा सशक्त होऊ शकेल. २०२१ ह्या वर्षी राहूचे आपल्या व्ययस्थानातून होणारे भ्रमण आपल्या खर्चात वाढ करणारे असल्याने आपणास खर्चाचे अंदाज पत्रक बनवून ठेवावे लागेल. खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या वर्षात आपले जवळ पासचे प्रवास कमी झाले तरी दीर्घ पल्ल्याचे प्रवास खर्चिक होतील. तसेच आपल्या प्रकृतीवर सुद्धा अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. ह्या कारणांमुळेच सुरवाती पासून अंदाज पत्रक तयार केल्यास संभाव्य आव्हानांना सामोरे जाता येईल. अतिरिक्त खर्चांचेच एकमात्र आव्हान असेल ह्या व्यतिरिक्त इतर काही आर्थिक समस्या ह्या वर्षात निर्माण होणार नसल्याचे लक्षात ठेवावे.

नोकरी, व्यवसाय, करिअर (Gemini,Job-Career-Business Horoscope 2021)

मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष अनेक चढ - उतार आणणारे आहे. वर्षाच्या सुरवातीस आपण एखाद्या कार्यासाठी खूप परिश्रम कराल व त्याचे परिणाम आपणास वर्षाच्या मध्यास मिळू शकतील. आपल्या कौशल्याचे योग्य कौतुक होत नाही असे आपणास अधून मधून वाटत राहील त्यामुळे व्यथित होऊन आपण नोकरीत बदल करण्याचा विचार सुद्धा कराल, मात्र आपण जर थोडा धीर धरलात तर वर्षाच्या मध्यास स्थितीत बदल होऊन नोकरीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या कौशल्याचे खूप कौतुक होईल. २०२१ चा मध्य नोकरीसाठी उत्तम आहे. ह्या दरम्यान नोकरीत बदल करण्याचा विचार आपणास सोडून द्यावा लागेल. वर्षाच्या अखेरच्या महिन्यात कामानिमित्त आपणास दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. व्यापाराच्या दृष्टिकोनातून बघता भागीदारी व्यवसायासाठी हे वर्ष विशेष अनुकूल नसल्याने भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. आपण जर एकट्यानेच व्यापार करत असल्यास हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणारे आहे.

शिक्षण (Gemini,Education Horoscope 2021)

मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२१ ह्या वर्षाची सुरवात सामान्यच होईल. आपल्या शिक्षणात थोडी विघ्ने आली तरी आपण आपले अध्ययन चालू ठेवू शकाल. आपल्या प्रकृतीमुळे शिक्षणात काही विघ्ने येण्याच्या शक्यतेमुळे स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील व त्या नंतरच त्यांना आंशिक यश प्राप्त होऊ शकेल. वर्षाच्या सुरवातीचे व मध्याचे दिवस परदेशी शिक्षण संस्थेत किंवा विश्व विद्यालयात प्रवेश घेण्यास अनुकूल आहेत. आपण जर कोठे प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केला असेल तर त्यात आपणास यश प्राप्ती होऊ शकेल. असे असले तरी ज्ञान प्राप्तीच्या अनेक संधी आपणास मिळू शकतील. एखादे विशेष साधू किंवा ज्ञानी पुरुष जीवनात आल्याने आपल्या जीवनाच्या दिशेत बदल होऊ शकेल. आपणास आध्यात्मिक विषयांची सुद्धा गोडी लागेल. आध्यात्मिक विषयातील महत्वाच्या गोष्टी शिकण्यास आपले प्राधान्य राहील.

आरोग्य  (Gemini,Health Horoscope 2021)

मिथुन राशीच्या जातकांना २०२१ दरम्यान आरोग्य विषयक विशेष अशी काही समस्या असणार नाही. असे असले तरी वर्षाची सुरवात आरोग्याच्या दृष्टिकोनातून मध्यम फलदायी असेल. ह्या वर्षी आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असल्याने कोणतेही आजार त्वरित निर्माण होऊन त्याचा त्रास संभवत असल्याने संपूर्ण वर्षभर आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या दिनचर्येत नियमितपणा आणण्याचा प्रयत्न करून भरपूर प्रमाणात पौष्टिक पदार्थ आहारात ठेवावेत. जानेवारी व फेब्रुवारी हे दोन महिने आरोग्यासाठी काहीसे नाजूक आहेत. अशावेळी आरोग्याप्रती बेफिकीर न राहता योग्य ती काळजी घ्यावी. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. वर्षाच्या मध्यास प्रकृतीत सुधारणा होऊन आपण सशक्त होऊ शकाल. मे महिन्यात आपण वैद्यकीय तपासणी करून घेतल्यास आपणास आरोग्य विषयक समस्यांची स्पष्टता होऊ शकेल. त्या नंतरचे दिवस आरोग्यासाठी चांगले आहेत. विशेषतः वर्षाचे अखेरचे दिवस आरोग्यासाठी उत्तम असले तरी एकंदरीत हे वर्ष प्रकृतीच्या दृष्टीने काहीसे नाजूक असल्याने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Gemini horoscope 2021: Gemini Horoscope 2021 in Marathi, Career, Education, Love, Relationship and Health Horoscope, Mithun Rashi Bhavishya 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.