राशीभविष्य - १३ मार्च २०२१: कर्क राशीतील व्यक्तींना कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक अन् मानसिक अस्वास्थ्य सतावेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 07:18 AM2021-03-13T07:18:09+5:302021-03-13T07:30:48+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - लक्ष्मीकृपेचा आज आपल्यावर वर्षाव होईल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक पातळीवर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहोत्सुकांना यश मिळेल. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसायात अनुकूल स्थिती. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल.आणखी वाचा
मिथुन - प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आनंददायक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. आणखी वाचा
कर्क - अनैतिक आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य सतावेल. दुपारनंतर परदेशातून वार्ता येतील. संततीविषयक काळजी राहील. आणखी वाचा
सिंह - आज आपणाला मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील असे गणेशजी सांगतात. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीचा आनंद लुटाल. दुपारनंतर मात्र खूप विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. आणखी वाचा
कन्या- गणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ जाईल. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. आणखी वाचा
तूळ – लेखनकार्य आणि सृजनशीलता या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. बौद्धिक चर्चेतून लाभ होण्याविषयी आपण विचार कराल. त्यात यशही मिळेल. कीर्ती वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज हट्ट सोडा असे गणेशजी सुचवितात. भावनेच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक नियोजन कराल. वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. आईकडून लाभ मिळेल. आणखी वाचा
धनु - आज मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय ध्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. आणखी वाचा
मकर - आज धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल. वादविवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होऊ नये याकडे लक्ष द्या. परिवारातील सदस्यांचे मन दुखावेल व ते नाराज होतील. दुपारनंतर मनातील चिंता दूर होतील. आणखी वाचा
कुंभ - आज आपले मन आनंदी राहील असे गणेशजी सांगतात. गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. उक्तीवर संयम ठेवा. आणखी वाचा
मीन - कोणाशी आर्थिक व्यवहार करू नका व वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेशजी देतात. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुप्रसंग उद्भवतील. आणखी वाचा