राशीभविष्य - १४ मे २०२१ : हितशत्रूंपासून सावध रहा, कृतीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 07:25 AM2021-05-14T07:25:33+5:302021-05-14T07:26:20+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - आज स्वतःचे खाजगी विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करा असे श्रीगणेश सांगतात. घर आणि घरातील व्यक्तींचे काम करताना समाधानकारक व्यवहार स्वीकारणे योग्य ठरेल. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेश म्हणतात की आज आर्थिक जवाबदारीकडे खास लक्ष द्याल आणि योग्य आर्थिक नियोजनही कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा
मिथुन - उक्ती आणि कृती यामुळे काही संकट उभे राहणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आवेश आणि उग्रपणा यांमुळे कोणाशी भांडण होणार नाही. आणखी वाचा
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभकारी आहे. नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा
सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव पडेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्यांवर आपल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडून ते आपणावर खूष राहतील. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेने भरलेला असेल असे श्रीगणेश सांगतात. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव असेल. थकवा आणि अशक्तपणामुळे कामे मंद होतील. आणखी वाचा
तूळ – कोणाशी वादविवाद किंवा भांडण न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण हितावह ठरेल. हितशत्रूंपासून सावध राहा. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. वस्त्रालंकार, वाहन व भोजनसुख चांगले मिळेल. मानप्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस अनुकूल आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शरीर स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता राहील नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण. आणखी वाचा
मकर - शारीरिकदृष्ट्या आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांना तुमचे काम आवडणार नाही. आणखी वाचा
कुंभ - स्वभावातील हट्टीपणा सोडण्याची सूचना श्रीगणेश देतात. भावूकतेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. सामाजिक प्रतिष्ठा भंग पावणार नाही, याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
मीन - महत्त्वाचे निर्णय घ्यायला दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल.आणखी वाचा