राशीभविष्य - 29 जानेवारी 2021: आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल, त्यामुळे दक्षता घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 07:13 AM2021-01-29T07:13:12+5:302021-01-29T07:14:13+5:30
Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे कोणाकडून आपल्या भावना दुखावल्या जाण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज आपण जास्त संवेदनशील आणि भावूक विचार मनात आणाल आणि त्यामुळे मन द्रवेल. आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर होईल.आणखी वाचा
मिथुन - नातलग आणि मित्रांसोबत संवाद साधल्याने आज आनंदी राहाल. असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. आणखी वाचा
कर्क - आज आपल्या मनात प्रेम भावनेचे तरंग उमटतील. त्याच मूड मध्ये राहाल. मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. आणखी वाचा
सिंह - कोर्ट कचेरीच्या प्रश्नात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अनैतिक कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या. आणखी वाचा
कन्या - आपणांसाठी घर, कुटुंबीय, व्यापार अशी सर्व क्षेत्रे लाभ देण्यासाठी तयार आहेत. मित्रांसोबत आनंददायी प्रवास घडेल. दांपत्यजीवनात जादा जवळीक निर्माण होईल. आणखी वाचा
तूळ – आपणाला नोकरीत बढतीचे योग दिसतात. वरिष्ठांची आपणावर कृपादृष्टी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. मनात भावनात्मकता वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा संमिश्र राहील असे श्रीगणेश सांगतात. लेखन- साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायात प्रतिकूल वातावरण. आणखी वाचा
धनु- खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. कामात यश मिळायला विलंब झाल्याने निराशा वाटेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. आणखी वाचा
मकर - व्यापार वाढीचे योग आहेत. त्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन अशा विविध मार्गांनी पैसा मिळून धनभांडारात वाढ होईल. आणखी वाचा
कुंभ - सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळेल व प्रसिद्धी पण मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. माहेरहून अनेक शुभवार्ता येतील. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आणखी वाचा