राशीभविष्य - १ फेब्रुवारी २०२१: भावनेच्या भरात मन वाहू देऊ नका, गैरसमज दूर करणे आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 07:14 AM2021-02-01T07:14:50+5:302021-02-01T07:16:25+5:30
Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - आज आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहील तसेच मनही प्रसन्न असेल. काल्पनिक जगातून सहल करताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात तुम्ही नवनिर्मिती दाखवाल, विद्यार्थी अभ्यासात चमकतील. आणखी वाचा
वृषभ - आज आपण वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे असे श्रीगणेश सांगतात. जलाशयापासून दूर रहा. जमीन आणि संपत्ति यांच्या कागद-पत्रांवर सही करताना काळजी घ्या. आणखी वाचा
मिथुन - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस सुखा- समाधानात जाईल. भावंडांशी ताळमेळ साधल्याने आपला फायदा होईल. स्वजन व मित्र भेटतील.आणखी वाचा
कर्क - लाभ देण्यासाठी आजचा दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहज पार पडतील. आणखी वाचा
सिंह - आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलपूर्ण राहील असे श्रीगणेश सांगतात. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कन्या - भावनेच्या भरात मन वाहू देऊ नका. गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. कोणाशी उग्र वाद किंवा भांडण टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद टाळा. आणखी वाचा
तूळ – श्रीगणेश सांगतात की आज नवे कार्य हाती घेऊ नका. वैचारिक पातळीवर मन अडकून पडेल आणि मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. आणखी वाचा
वृश्चिक - व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल असे श्रीगणेश सांगतात. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
धनु- आज स्वाभावात उग्रपणा आणि तब्बेत कमजोर राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रा किंवा प्रवासाची शक्यता. व्यवसायात अडथळा किंवा विवाद होण्याची शक्यता. आणखी वाचा
मकर - आजारपणावर खर्च करावा लागेल असे श्रीगणेश सांगतात. अचानक धन खर्चाची शक्यता. घरातील सदस्यांबरोबर खडाजंगी होणार नाही याचे भान ठेवा. आणखी वाचा
कुंभ - आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून काम करा असा सल्ला श्रीगणेश देतात. वैवाहिक जीवनात दुःखद प्रसंग अनुभवाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. आणखी वाचा
मीन - श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. आणखी वाचा