राशीभविष्य - २६ मार्च २०२२: आर्थिक आवाक चांगली राहील; मालमत्तेचे काम होईल, एखादा अंदाज चुकू शकतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:58 AM2022-03-26T07:58:43+5:302022-03-26T08:01:31+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष- कामात यश मिळेल. मात्र कामाचा ताण राहील. लोक मदत करतील. आरोग्याची काळजी घ्या. कामे करताना तब्येतीकडे लक्ष द्या. वेळ वाया घालवू नका.
वृषभ- मनात अस्वस्थता राहील. काळजीचा विचार राहील. आरोग्याची काळजी घ्या. संयम सोडू नका. महत्वाच्या कामात अडचणी येतील. सरकारी कामात थोडीफार प्रगती होईल. जुणी येणी वसूल होतील.
मिथुन- ग्रहमान अनुकूल राहील. विविध कामात यश मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. घरात समन्वय राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल.
कर्क- आर्थिक बाजू चांगली राहील. मनावर थोडा ताण राहील. काळजीचे विचार राहतील. वादापासून दूर राहा. अनावश्यक बोलणे टाळा. जोडीदार चांगली साथ देईल. लोक तुमचे कौतुक करतील.
सिंह- नोकरीत आरामदायक परिस्थिती राहील. दगदग कमी होईल. अडचणी दूर होतील. लोकांची मदत मिळेल. मुलांच्या अडचणी दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
कन्या- ग्रहमान तुमच्या बाजूने राहील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत प्रगतीपूरक तुमच्या मनासारख्या घटना घडतील. नवीन संधी मिळेल. त्याचा फायदा होईल. नातेवाईकांची भेट होईल. आर्थिक आवाक चांगली राहील.
तूळ- आर्थिक उलाढाल जपून करा. एखादा अंदाज चुकू शकतो. जाणकरांचा सल्ला घ्या. व्यवसायात बरकत राहील. हाती पैसा येईल. मात्र अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
वृश्चिक- मुलांच्या यशामुळे आनंद होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनासारखे भोजन मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. अनेक प्रकारचा लाभ होईल. मालमत्तेचे काम होईल. तब्येतीची काळजी घ्या.
धनू- आर्थिक आवाक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागल्याने मोकळे वाटेल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीचा लाभ मिळेल. नोकरीत आरामदायक परिस्थिती राहील.
मकर- दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. काही निरोप येतील. महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. जोडीदार चांगली साथ देईल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.
कुंभ- आर्थिक बाजू बळकट राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. जुनी येणी वसूल होतील. महागड्या वस्तू खरेदी कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. घरी मिठाई आणली जाईल. नातेवाईकांची भेट होईल.
मीन- नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल. मात्र कामाचा ताण राहील. मुलाखतीत यश मिळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनूसार वागेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. - विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)