राशीभविष्य - ८ मार्च २०२१; धनुच्या वैवाहिक जीवनात आनंद, कुंभच्या विवाहोत्सुकांसाठी विवाहाचे योग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 07:33 AM2021-03-08T07:33:29+5:302021-03-08T07:36:16+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Horoscope - March 7, 2021; Happiness in the marital life of Sagittarius | राशीभविष्य - ८ मार्च २०२१; धनुच्या वैवाहिक जीवनात आनंद, कुंभच्या विवाहोत्सुकांसाठी विवाहाचे योग

राशीभविष्य - ८ मार्च २०२१; धनुच्या वैवाहिक जीवनात आनंद, कुंभच्या विवाहोत्सुकांसाठी विवाहाचे योग

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपणाला थकवा, आळस आणि व्यग्रता जाणवेल. उत्साह वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीत राग येईल. आणखी वाचा.

वृषभ - आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्याचा आरंभ न करण्याचा सल्ला देतात. खाण्या- पिण्यावर विशेष लक्ष द्या. आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेशांच्या मते आज आपण मनोरंजन आणि आनंदात मग्न राहाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंदी वातावरणात दिवस घालवाल. आणखी वाचा.

कर्क - श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आनंदाचा आणि यशदायक असेल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. महत्त्वाच्या कामावर खर्च होईल. आणखी वाचा.

सिंह - आज आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश म्हणतात. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल संततीकडून आनंददायक बातम्या प्राप्त होतील. आणखी वाचा.

कन्या - आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा.

तूळ - आज भाग्योदय होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. भावा- बहिणींशी चांगले संबंध राहतील. धार्मिक यात्रेचे नियोजन कराल. आणखी वाचा.

वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाणीवर ताबा ठेवा. त्यामुळे कुटुंबात सुख- शांति राहील. विचारांवर नकारात्मक पगडा पडेल. आणखी वाचा.

धनु - शारीकि आणि मानसिक स्वास्थ्य याकडे लक्ष द्या. ठरलेली कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास, तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा.

मकर - आज सावधान राहण्याविषयी श्रीगणेश सांगत आहेत. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्च वाढेल. धार्मिक व सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आणखी वाचा.

कुंभ - नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी धंद्यात फायदा होऊ शकतो. स्त्रीयांकडून कामे होऊ शकतात. आणखी वाचा.

मीन- श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. नोकरी व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणावर खुश राहतील. त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा.
 

Web Title: Horoscope - March 7, 2021; Happiness in the marital life of Sagittarius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.