राशीभविष्य - ९ मार्च २०२१; मिथुन राशीने आज रागावर संयम ठेवला नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 07:22 AM2021-03-09T07:22:40+5:302021-03-09T07:23:19+5:30
Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. आणखी वाचा.
वृषभ - परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्यांना चांगली संधी आहे. आणखी वाचा.
मिथुन - निषेधार्ह विचारापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नका. रागावर संयम ठेवला नाही तर अनिष्ट प्रसंग उद्भवतील. आणखी वाचा.
कर्क - समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. आणखी वाचा.
सिंह - श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना वाणीवर संयम ठेवा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. आणखी वाचा.
कन्या - आज आपणांस कोणत्याही प्रकारचे भांडण आणि चर्चा दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढतील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. आणखी वाचा.
तूळ - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. मनात संवेदनशीलता जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव असेल. आणखी वाचा.
वृश्चिक - नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांबरोबर घराविषयी महत्त्वाच्या चर्चा कराल. आणखी वाचा.
धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. असामंजस्यामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड जाईल. मन दुःखी राहील. आणखी वाचा.
मकर - सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. आणखी वाचा.
कुंभ - आज मन आणिशरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.
मीन- आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल. आणखी वाचा.