राशीभविष्य - १७ मे २०२२: भाग्याचे पाठबळ मिळेल; हाती घेतलेले काम पूर्ण कराल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 07:15 AM2022-05-17T07:15:47+5:302022-05-17T07:16:02+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष – सामोपचाराने कामे करण्यावर भर दिला पाहिजे. कामे पूर्ण झालीच पाहिजे असा अट्टाहास करू नका. प्रवासात अडचणी येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मनावरील ताण वाढू नये यासाठी प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार करा. खर्च कमी करा.
वृषभ – नोकरीत चांगली परिस्थिती राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. जोडीदार मर्जीनुसार वागेल. व्यवसायात अनेकांचे सहकार्य मिळेल. विविध प्रकारचे फायदे होतील. आर्थिक आवक चांगली राहील. काहींना अचानक धनलाभ होईल.
मिथुन – नोकरीत मोठी संधी चालून येईल. त्या संधीचा फायदा द्या. विविध प्रकारचे लाभ होतील. घरात किरकोळ कारणावरून कुरबूर होईल. काही कारणाने गैरसमज होईल. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क – भाग्याचे पाठबळ मिळेल. तुमचे पारडे जड राहील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. काहींना प्रवास होतील. प्रवास कार्य साधक ठरतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाचे काम होईल.
सिंह – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. मोठी संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरी पाव्हण्या रावळ्यांचा राबता राहील. वाहन जपून चालवा.
कन्या – व्यवसायात बरकत राहील. सतत कार्यरत राहाल, नातेवाईकाच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. तरूण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. एखादी चांगली बातमी कळेल.
तूळ – आर्थिक आवक चांगली राहील. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल.
वृश्चिक – ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. मन प्रसन्न राहील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. प्रेमात सफलता मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल.
धनू – नोकरीत चांगली परिस्थिती राहील. सहकारी मदत करतील. सुखसोयी वाढवून मिळतील. वाहन सुख मिळेल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला. काहींना प्रवास घडून येतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. भावंडांशी सख्य राहील. दगदग होईल अशी कामे करू नका.
मकर – विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. प्रवास घडून येतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या यशाची वार्ता कळेल. व्यवसायात बरकत राहील.
कुंभ – नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. ज्याचे नोकरीसाठी प्रयत्न चालू असतील त्यांना आनंदाची बातमी कळेल. घरी पाहुणे येतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. आर्थिक सुबत्ता राहील.
मीन – व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करील. खबरदारी घ्या. वाहवत जाऊ नका. प्रवास होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.
विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)