राशीभविष्य - ६ मे २०२१: कर्क राशीतील व्यक्तींवर नकारात्मक विचारांचा पगडा राहील; संतापाचे प्रमाण वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 07:49 AM2021-05-06T07:49:01+5:302021-05-06T07:55:16+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसोबत घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. आणखी वाचा
वृषभ -नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. गृहस्थ जीवनात सुख- समाधान लाभेल. आणखी वाचा
मिथुन - श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. तब्बेत बिघडेल. त्यामुळे कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार आहे. नोकरी धंद्यात सहकारी आणि उच्च अधिकारी यांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिकदृष्ट्या निराश व्हाल. आणखी वाचा
कर्क -श्रीगणेश सांगतात की आज तुमच्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीच्या तक्रारी राहतील. अनैतिक काम आणि चोरी सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण मनोरंजन आणि हिंडण्या- फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीन असेल. जोडीदाराची तब्बेत बिघडेल. आणखी वाचा
कन्या - श्रीगणेश सांगतात की कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील आणि स्वास्थ्य पण चांगले राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात सफलता आणि यश मिळेल. आणखी वाचा
तूळ – आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा यांत भाग घेणे तुम्हाला आवडेल. संततीकडून शुभवार्ता मिळतील. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक स्वास्थ्य बघडेल आणि मानसिक दृष्ट्या बेचैन राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. आणखी वाचा
धनु -श्रीगणेश सांगतात की आज आपणावर गूढ रहस्यवाद आणि अध्यात्म रंग चढेल. म्हणून त्या विषयात खोलवर उतरण्याचा प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा
मकर - मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. घरातील व्यक्तींशी मतभेद न होण्याच्यादृष्टीने ही गोष्ट आवश्यक आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. आणखी वाचा
कुंभ -श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व दृष्टीनी आजचा दिवस आपणासाठी चांगला ठरेल. कुटुंबीयां समवेत रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा
मीन - कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा आणि पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. आणखी वाचा