राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२०; धनलाभाचे योग, संततीच्या अभ्यासाविषयी चिंता राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 10:08 PM2020-10-11T22:08:39+5:302020-10-11T23:15:32+5:30

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Horoscope - October 12, 2020 | राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२०; धनलाभाचे योग, संततीच्या अभ्यासाविषयी चिंता राहील

राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२०; धनलाभाचे योग, संततीच्या अभ्यासाविषयी चिंता राहील

Next

मेष 
आज सावधागीरी बाळगण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कारण आज आपण अधिक हळवे आणि संवेदनशील बनाल. साध्या घटनांनी मनाता ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या तब्बेतीची काळजी लागून राहील. आणखी वाचा 

वृषभ
श्रीगणेशाच्या मते आज आपल्या चिंता कमी होतील व उत्साह वाढेल. मन आनंदी राहील. जास्त भावूक आणि हळवे बनाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्यरचना कराल. आणखी वाचा 

मिथुन
मिश्रफलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. आज थकवा, कार्यमग्नता आणि प्रसन्नाता यांचा संमिश्र अनुभव घ्याल. निर्धारित कामे पूर्ण कराल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटेल पण नंतर यश मिळेल असेही वाटेल. आणखी वाचा 

कर्क
आज सर्वदृष्टीने आनंद देणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयांकडून सुख व आनंद मिळेल. त्यांच्याकडून काही भेटवस्तू मिळतील.  आणखी वाचा 

सिंह
संवेदनशीलतेवर संयम ठेवा असा सल्ला आज श्रीगणेश देत आहेत. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल.  आणखी वाचा 

कन्या
आज लाभदायक दिवसाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धनप्राप्तीसाठी शुभ दिवस. मैत्रिणींकडून लाभाचे संकेत आहेत. प्रियव्यक्तींशी भेट आनंददायी राहील.  आणखी वाचा 

तूळ
श्रीगणेशजी सांगतात आजचा दिवस शुभफलदायी असेल. तुमच्या घरी, कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकशीपेशात असलेल्या व्यक्तींना पदोन्नतीची संधी असेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. आईकडून लाभ होतील. 

वृश्चिक
आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. आणखी वाचा 

धनु
आज आपण खूप जपून राहा असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणतेही नवीन काम औषधोपचार सुरू करू नका. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी राहील. आणखी वाचा 

मकर
विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज ई. मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल, असे श्रीगणेश सांगतात. धनलाभाचे योग आहेत. संततीच्या अभ्यासाविषयी चिंता राहील.  आणखी वाचा  

कुंभ 
श्रीगणेश सांगतात की कार्य सिद्धीच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन-मन उत्साही व आनंदी असेल.  आणखी वाचा 

मीन
 आज आपण काल्पनिक जगात रमाल असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्जन करणार्‍यांना चमक दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्यापासून जपा.  आणखी वाचा 

Web Title: Horoscope - October 12, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.