राशीभविष्य - १४ ऑक्टोबर २०२०, सरकारी कामात यश मिळेल, नोकरीत बढती मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 09:43 PM2020-10-13T21:43:58+5:302020-10-13T21:45:52+5:30
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...
मेष - आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. अधिक कष्ट करूनही अल्प यश मिळेल. संततीची काळजी सतावेल. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल. अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल. माहेरहून लाभदायक वार्ता येतील. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा
मिथुन - नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. छोट्या प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा
कर्क - आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपणात आत्मविश्वासाचे प्रमाण जास्त असेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घ्याल. वडील आणि वडील धार्यांकडून लाभ होईल. आणखी वाचा
कन्या - आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. आणखी वाचा
तूळ – तुमच्यासाठी आजचा दिवस शुभफलदायी राहील. विविध क्षेत्रांमधून होणाऱ्या लाभांमुळे प्रसन्नतेत वाढ होईल. उत्पन्नातही वाढ होईल.
वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी जाण्याचे संकेत श्रीगणेश देतात. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. सहजगत्या कामे पूर्ण होतील. मानमरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा
धनु - आज तब्बेत यथा तथा राहील. शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. हानिकारक विचार दूर सारा. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करा. आणखी वाचा
मकर - अचानक धनखर्चाचे योग आहेत. त्यामुळे व्यावहारिक तथा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा. आणखी वाचा
कुंभ - आज खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक काम कराल. प्रवास- सहलीची शक्यता. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा
मीन - श्रीगणेश आज आपणाला शुभफलदायी दिवस सांगतात. मनोबल आणि आत्मविश्वास चांगला राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा