Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २६ एप्रिल २०२१; संतापाला आवर घाला, वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 07:22 AM2021-04-26T07:22:07+5:302021-04-26T07:22:32+5:30
Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. आणखी वाचा.
वृषभ - आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. आणखी वाचा.
मिथुन - आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. आणखी वाचा.
कर्क - अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. आणखी वाचा.
सिंह - आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा असे श्रीगणेश सुचवितात. घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आणखी वाचा.
कन्या - आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. इतर लोकांशी असणार्या संबंधात प्रेमवृद्धी होईल. आणखी वाचा.
तूळ - संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. आणखी वाचा.
वृश्चिक - जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांसमवेत प्रवासाला, फिरायला जाल. आणखी वाचा.
धनु - श्रीगणेश कृपेने आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा.
मकर - परदेशगमनाची अपेक्षा करणार्यांना यशाची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. आणखी वाचा.
कुंभ -नव्या कामाची सुरुवात आज करू नका असे श्रीगणेश सांगतात. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.
मीन- व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. असे श्रीगणेश सांगतात. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. आणखी वाचा.