Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २८ एप्रिल २०२१; वृश्चिकच्या संबंधितासोबत अप्रिय घटना घडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 07:18 AM2021-04-28T07:18:28+5:302021-04-28T07:18:52+5:30
Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू नका असा गणेशजींचा सल्ला आहे. आणखी वाचा.
वृषभ - धंदा- व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा.
मिथुन - आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा यात जाईल. आपली कल्पनाशक्ति व सृजनशीलता कामात वापराल. आणखी वाचा.
कर्क - निराशेमुळे मन अस्वस्थ राहील. त्यामुळे शरीरही अस्वस्थ बनेल. प्रवासाला दिवस प्रतिकूल आहे. आणखी वाचा.
सिंह - आज जवळचा प्रवास होईल असे संकेत गणेशजी देत आहेत. परदेशस्थांकडून चांगल्या वार्ता प्राप्त होतील. धनलाभ होईल. आणखी वाचा.
कन्या - मनाची द्विधा अवस्था विचारात घेता, नवीन कार्याचा आरंभ करू नका असा सल्ला गणेशजी देत आहेत. बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर मन दुखावण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा.
तूळ - गणेशजी सांगतात की आज कलात्मक व सृजनशक्ति खचितच वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा.
वृश्चिक - आपला संतापी व अनियंत्रित व्यवहार आप्ल्यास अडचणीत आणेल. संबंधिता बरोबर अप्रिय घटना घडतील. आणखी वाचा.
धनु - व्यवसाय- धंद्यात आजचा दिवस आपणांस फायदेशीर राहील असे गणेशजी सांगतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामात बढती मिळेल. आणखी वाचा.
मकर - कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंदाचा धंदा-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात अनुकूलता राहील. सहकारी चांगले सहकार्य करतील. आणखी वाचा.
कुंभ - आज बौद्धिक काम, नवनिर्मिती आणि लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू कराल. दूरचा प्रवास आणि धार्मिक सहलींचे आयोजन कराल. आणखी वाचा.
मीन- गणेशजी आज आपणाला उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. हितशत्रूपासून सावध राहा. गूढ विद्येचे ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टिने दिवस चांगला आहे. आणखी वाचा.