वृषभ राशिभविष्य 2021 : ह्या वर्षी स्थैर्य प्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 02:41 PM2020-12-17T14:41:55+5:302020-12-17T14:43:30+5:30

Taurus Horoscope 2021: २०२१ दरम्यान आपण दूरवरचे प्रवास कराल ज्यातील काही प्रवास हे तीर्थयात्रेसाठी असतील, म्हणजे ह्या वर्षात तीर्थयात्रांची संख्या इतर प्रवासांहून अधिक असेल. ह्या तीर्थयात्रांमुळे आपणास जीवनातील नवीन ऊर्जा प्राप्त होऊन आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल.

Taurus Horoscope 2021 in Marathi, Career, Education, Love, Relationship and Health Horoscope, Vrushabh Rashi Bhavishya 2021 | वृषभ राशिभविष्य 2021 : ह्या वर्षी स्थैर्य प्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होतील

वृषभ राशिभविष्य 2021 : ह्या वर्षी स्थैर्य प्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होतील

Next

२०२१ ह्या वर्षी वृषभ राशीच्या जातकांना आयुष्यात स्थिर होण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. जर आपणास संधीचा लाभ घेता आला तर २०२१ ह्या वर्षी आपण खूपच मोठी प्रगती करू शकाल. आपल्या लग्नी असलेला राहू आपणास काही बाबतीत निरंकुश करेल. ज्यामुळे आपण यशप्राप्तीसाठी अविरत परिश्रम करण्यास तयार व्हाल.  सुख उपभोगण्याची आपली इच्छा असल्याने त्यासाठी आपण प्रयत्नशील सुद्धा राहाल. आपल्या पाठीशी कुटुंबातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद असल्याने आपण कार्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने २०२१ चे वर्ष सामान्य फळ देणारेच राहील. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, २०२१ ह्या वर्षात वैवाहिक जीवनाचे सौख्य हे सरासरीच असणार आहे. कुटुंबात आपली स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. २०२१ दरम्यान आपण दूरवरचे प्रवास कराल ज्यातील काही प्रवास हे तीर्थयात्रेसाठी असतील, म्हणजे ह्या वर्षात तीर्थयात्रांची संख्या इतर प्रवासांहून अधिक असेल. ह्या तीर्थयात्रांमुळे आपणास जीवनातील नवीन ऊर्जा प्राप्त होऊन आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. काही जातकांची परदेशवारीची इच्छा पूर्ण होऊ शकेल. तसेच काही जातकांना आपल्या कर्माची फळे सुद्धा भोगावी लागतील. आपण जर कायद्याविरुद्ध काही कार्य केले असेल तर २०२१ च्या सुरवातीलाच शासनाकडून शिक्षा होऊ शकते, त्यामुळे आपणास काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या एखाद्या शिक्षकांची किंवा प्राध्यापकांची कृपा दृष्टी होऊन आपणास मोठे यश प्राप्त होईल. ते आपले तारणहार ठरतील. आपला वैवाहिक जोडीदार जर नोकरी करत असेल तर २०२१ दरम्यान त्यांना परदेशात जाण्याची संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

वैवाहिक जीवन (Taurus,Love and relationship Horoscope 2021)

वृषभ राशीच्या जातकांसाठी २०२१ दरम्यान वैवाहिक जीवनाची सुरवात चांगली होऊन आपल्या प्रेमातील खरेपणा वृद्धिंगत होईल. प्रेमाप्रती आपण गंभीर व्हाल. ह्यात विशेष म्हणजे आपला जोडीदार सुद्धा आपणास प्रसन्न ठेवण्यास प्रयत्नशील राहील. आपल्यातील एकमेकां बद्दलचा आदर दृढ झाल्याने वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. वर्षाच्या सुरवातीस आपल्या प्रियव्यक्तीसह एखाद्या रम्य ठिकाणी फिरावयास जाण्याच्या किंवा एकांतात वेळ घालविण्याच्या संधीचा शोध आपण घ्याल. मार्च ते एप्रिल दरम्यानचा काळ आपल्या वैवाहिक जीवनासाठी अत्यंत अनुकूल आहे. ह्या दरम्यान आपल्या मनातील सर्व गोष्टी मोकळेपणाने जोडीदारास आपण सांगाल. आपणास जोडीदाराच्या मनाचा थांगपत्ता सुद्धा लागू शकेल. वृषभ राशीच्या जातकांसाठी २०२१ चे अखेरचे तीन महिने वैवाहिक जीवनास संजीवनी देणारे राहतील, इतकेच नव्हे तर पूर्वी  आपल्या संबंधात काही कटुता आली असल्यास ह्या दरम्यान त्याचे निराकारण होऊन त्यास नवसंजीवनी सुद्धा मिळेल. आपण विवाहित असल्यास २०२१ च्या सुरवातीस संबंधात तणाव असून सुद्धा प्रेमातील गोडवा टिकून राहील, मात्र आपणास संबंधात विश्वास निर्माण करावा लागेल. काही मतभेद होण्यापूर्वी गरज भासल्यास जोडीदाराशी स्पष्टपणे बोलून संभाव्य गैरसमज टाळून आपल्यातील संबंध दृढ करावे. वर्षाचे मधले दिवस अपेक्षेनुसार अनुकूल राहिले तरी २०२१ चे अखेरचे काही महिने आव्हानात्मक असू शकतात.

१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा! 

आर्थिक (Taurus,Finance Horoscope 2021)

वृषभ राशीच्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष पैसा व निधीच्या बाबतीत सरासरीहून चांगले राहू शकते. असे असले तरी सुरवातीचे काही महिने आपल्यासाठी मध्यम फलदायी राहण्याची शक्यता असून ह्या दरम्यान अनावश्यक धनहानी होण्याच्या शक्यतेमुळे आपणास आपल्या पैशांचा सदुपयोग करण्याचा विचार करावा लागेल. आपण कोणाला पैसे दिल्यास त्याची परतफेडीची स्थिती संशयात्मक राहिल्याने वसुलीसाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील व म्हणून ह्या वर्षी आपण कोणासही उसने पैसे देऊ नये. जानेवारी ते मार्च दरम्यान आपणास बराच पैसा खर्च करावा लागेल. आपण आपल्या निधीवर नियंत्रण ठेवल्यास ते लाभदायी होईल. आर्थिक लाभासाठी एप्रिल, जून, जुलै, ऑक्टोबर व नोव्हेंबर हे महिने अत्यंत लाभदायी आहेत. ह्या दरम्यान आपणास विविध मार्गाने धन प्राप्ती होईल. वृषभ राशीच्या जातकांसाठी २०२१ चा शेवटचा महिना प्राप्तीच्या बाबतीत काहीसा निर्बलच आहे. ह्या दरम्यान एखाद्या वादामुळे आपला पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.

नोकरी, व्यवसाय, करिअर (Taurus,Job-Career-Business Horoscope 2021)

२०२१ हे वर्ष वृषभ राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सुरवातीस व अखेरच्या काही महिन्यांपर्यंत उत्तम राहणार आहे. त्यांच्या नोकरीत मनोवांच्छित स्थानांतर होण्याची शक्यता असून त्यामुळे आपली प्रतिमा उज्ज्वल तर होईलच शिवाय आपल्या कामात प्रगती सुद्धा होईल. हे वर्ष आपल्या उन्नतीसाठी उत्तम असून आपण मिळालेल्या संधींचा जितका जास्त उपयोग कराल तितका आपणास चांगला फायदा होईल. थोडक्यात आपण म्हणू शकतो कि २०२१ हे वर्ष वृषभ राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी उत्तमच आहे. असे असले तरी वर्षाच्या मध्यास आपले विरोधक सक्रिय होऊन आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्याच्या शक्यतेमुळे आपणास थोडी काळजी घ्यावी लागेल. डिसेंबर महिन्यात आपल्या एखाद्या चुकीमुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता असल्याने आपणास थोडी काळजी घ्यावी लागेल. आपण जर व्यापार करत असाल तर २०२१ ची सुरवात आपल्यासाठी चांगली होईल. परराष्ट्रांशी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना अधिक फायदा होईल. आपले नवीन काही संपर्क प्रस्थापित होऊन व्यापारवृद्धी सुद्धा होईल. फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंतचा कालखंड काहीसा मंदावलेला राहील. ह्या दरम्यान व्यापारात कोणतीही नवीन आर्थिक गुंतवणूक करू नये. तसेच विनाकारण आपल्या व्यावसायिक भागीदारांशी एखाद्या गोष्टीवरून वाद घालू नये. जुलै व ऑगस्ट हे महिने अत्यंत अनुकूल असून वर्षाच्या अखेरच्या महिन्यात आपल्या व्यापारात प्रगती होईल.

शिक्षण (Taurus,Education Horoscope 2021)

२०२१ च्या सुरवातीस वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांत एकाग्रतेचा अभाव असल्याने विषय समजण्यास अवघड होईल व त्यामुळे त्यांना शिक्षणात समस्यांना सामोरे जावे लागण्याची परिस्थिती निर्माण होऊन मिळणारे फळ हे मध्यम स्वरूपाचेच असेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. जे आधीपासूनच जोरात अभ्यास करत आहेत त्यांना चांगले यश प्राप्त होईल. इतकेच नव्हे तर विषयांचे आकलन सुद्धा चांगले होईल. वृषभ राशीच्या जातकांच्या ज्ञानाचे कौतुक होऊन आवश्यक कामांसाठी लोकांकडून त्यांचा सल्ला सुद्धा घेण्यात येईल. २०२१ च्या मध्यास परदेशी जाऊन शिक्षण घेण्यास अनुकूलता लाभली तरी ती आंशिक असण्याच्या शक्यतेमुळे त्याची तयारी जोरात करावी. ऑक्टोबर व नोव्हेंबर हे महिने शैक्षणिक उन्नतीसाठी उत्तम असून आपणास शैक्षणिक जीवनात उत्कृष्ट यश प्राप्ती होऊ शकेल.

आरोग्य  (Taurus,Health Horoscope 2021)

२०२१ च्या सुरवातीस आरोग्याच्या दृष्टिकोनातून मध्यम फळ मिळेल. आरोग्य उत्तम राहिले तरी प्रकृतीस किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. पोटाचे विकार होण्याच्या शक्यतेमुळे शिळे पदार्थ खाणे टाळावे. वर्षाचे प्रथम दोन महिने आरोग्याच्या बाबतीत काहीसे नाजूकच आहेत. ह्या दरम्यान आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होऊन  आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने आपणास योग्य ती काळजी घ्यावी लागेल. वर्षाचा मधला कालखंड आरोग्याच्या बाबतीत आपणास अनुकूल असून ह्या दरम्यान आपले आरोग्य उत्तम राहील. २०२१ दरम्यान वृषभ जातकांच्या बेफिकिरी वृत्तीमुळे विनाकारण आरोग्यावर ताण येऊन प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल. अचानकपणे एखादे आजारपण येईल व तशीच त्यातून सुटका सुद्धा होईल. आपणास जास्त काळजी करावी लागणार नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वर्षाचे अखेरचे महिने अधिक अनुकूल आहेत.

Web Title: Taurus Horoscope 2021 in Marathi, Career, Education, Love, Relationship and Health Horoscope, Vrushabh Rashi Bhavishya 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.