आजचे राशीभविष्य, 2 फेब्रुवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 07:43 AM2020-02-02T07:43:23+5:302020-02-02T07:43:54+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसमवेत स्नेहसंमेलन समारंभाला उपस्थित राहाल. आणखी वाचा
वृषभ - शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल. काळजीमुळे मनावर ताण राहील. त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. कुटुंबीयांशी पण मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. आणखी वाचा
मिथुन - श्रीगणेश सांगतात की व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. आणखी वाचा
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. आणखी वाचा
सिंह - आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आणखी वाचा
कन्या - खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या असा श्रीगणेशाचा सल्ला आहे. अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
तूळ - आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसमवेत बाहेर जावे लागेल. छोटया प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा
वृश्चिक - सर्व दृष्टींनी आजचा दिवस सुखात जाईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल.शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता अनुभवाल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेश आज आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता. आणखी वाचा
मकर - प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी तंटा बखेडा किंवा निरर्थक चर्चेचे प्रसंग येतील. आणखी वाचा
कुंभ - आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. तब्बेत पण चांगली राहील. आणखी वाचा
मीन - मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा. कोणाशी वादविवाद किंवा तंटा बखेडा टाळण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा