आजचे राशीभविष्य - 26 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 07:43 AM2019-05-26T07:43:56+5:302019-05-26T07:45:05+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईळ. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. अधिक वाचा
वृषभ - आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. अधिक वाचा
मिथुन - आज दिवसभरात थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. अधिक वाचा
कर्क - संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. अधिक वाचा
सिंह - आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा
कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख- शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. अधिक वाचा
तूळ - बौद्धिक कामे आणि चर्चेमध्ये अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. अधिक वाचा
वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्यांशी पटणार नाही त्यामुळे मनाला वेदना होतील. अधिक वाचा
धनु - गूढ रहस्यमय विद्या, अध्यात्माचा आपणावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास आणि संशोधन यांत गोडी राहील. अधिक वाचा
मकर - संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. अधिक वाचा
कुंभ- शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि उत्साहपूर्ण दिवस. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. अधिक वाचा
मीन - आज आपल्या मनाची एकाग्रता राहील. त्यामुळे मानसिक व्यग्रता राहील. अधिक वाचा