आजचे राशीभविष्य- 24 ऑगस्ट 2020; लाभच लाभ होतील, अविवाहितांना विवाहाचे योग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 07:09 AM2020-08-24T07:09:57+5:302020-08-24T07:10:32+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - श्रीगणेश कृपेने आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कुटुंबात आणि दांपत्यजीवनात सुख- समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. आणखी वाचा.
वृषभ - उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाची चेष्टा- गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. गैरसमज निर्माण होतील. आणखी वाचा.
मिथुन - श्रीगणेश सांगतात की आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख- शांती राहील. पत्नीसाठी खर्च करावा लागेल. अविवाहितांना विवाहाचे योग आहेत. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. आणखी वाचा.
कर्क - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी खडाजंगी उडेल. गावात मानहानी होणार नाही याची दक्षता घ्या. आणखी वाचा.
सिंह - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज शरीर आणि मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी- पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आणखी वाचा.
कन्या - मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. घरातील व्यक्तींशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. आणखी वाचा.
तूळ - श्रीगणेश सांगतात की सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक आणि सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील.आणखी वाचा.
वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज विदेशात राहणारे स्नेही आणि नातलगांकडून शुभ वार्ता मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा.
धनु - प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. श्रीगणेश सांगतात की आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आज लाभदायक दिवस आहे. आणखी वाचा.
मकर - व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाला रंग चढतील. घर, परिवार आणि संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. आणखी वाचा.
कुंभ - श्रीगणेश सांगतात की आज स्वतःला अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्ट्या शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात अधिकार्यांपासून सावध राहा. आणखी वाचा.
मीन - अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक आणि मानसिक कष्टाची तयारी ठेवा. तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. खर्च वाढेल. आणखी वाचा.