आजचे राशीभविष्य - 01 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 07:34 AM2020-01-01T07:34:13+5:302020-01-01T07:34:39+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा
वृषभ - नवीन कामाचे नियोजन करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. आणखी वाचा
मिथुन - प्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे. आणखी वाचा
कर्क - मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
सिंह - पती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जीवनसाथीच्या तब्बेतीची चिंता राहील. आणखी वाचा
कन्या - शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल. आणखी वाचा
तूळ - आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीची भेट रोमांचक ठरेल. आणखी वाचा
वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल असे श्रीगणेश सांगतात. कोणती ना कोणती चिंता सतावेलच. आणखी वाचा
धनु - गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे. आणखी वाचा
मकर - श्रीगणेश आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा
कुंभ - शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. आणखी वाचा
मीन - आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल. आणखी वाचा