आजचे राशिभविष्य 04 एप्रिल 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 07:24 AM2020-04-04T07:24:14+5:302020-04-04T07:34:39+5:30
कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज प्रत्येक पाऊल जपून उचलण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या. शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त राहाल. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहाल. आणखी वाचा
मिथुन - नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला असे श्रीगणेश सांगत आहेत. असंतोषाची भावना मनात वाढेल. कौटुंबिक वातावरणात ताळमेळ राहणार नाही. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. आणखी वाचा
कर्क - भावनेच्या भरात वाहून जाऊ नका अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. आणखी वाचा
सिंह - कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सुचवितात. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांती लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा
तूळ - आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल, असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज भाग्योदयाचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या वार्ता येतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धार्मिक हेतूने प्रवासाची शक्यता. आणखी वाचा
धनु - आज सकाळच्या वेळी शरीर प्रकृती ठीक नसेल असे श्रीगणेश सांगतात. निषेधार्ह विचार मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम साधतील. सबब वैचारिक स्तरावर संयम राखणे आवश्यक. आणखी वाचा
मकर - आज कुटुंबीयांबरोबर आनंदपूर्वक प्रवासाचा अनुभव घ्याल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा
कुंभ - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा जाईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा
मीन - आज विजातीय आकर्षणापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. नवीन कार्य हाती घेऊ नका. आणखी वाचा