आजचे राशीभविष्य - 04 फेब्रुवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 07:19 AM2020-02-04T07:19:11+5:302020-02-04T07:19:37+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
घर आणि घरातील व्यक्तींचे काम करताना समाधानकारक व्यवहार स्वीकारणे योग्य ठरेल. वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतील. आणखी वाचा
वृषभ
आर्थिक जवाबदारीकडे खास लक्ष द्याल आणि योग्य आर्थिक नियोजनही कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. उत्साही मन आणि स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आणखी वाचा
मिथुन
आवेश आणि उग्रपणा यांमुळे कोणाशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या. तब्बेत चांगली राहणार नाही. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. आणखी वाचा
कर्क
नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. अविवाहितांना विवाहयोग आहेत. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. आणखी वाचा
सिंह
वरिष्ठ अधिकार्यांवर आपल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडून ते आपणावर खूष राहतील. दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. आणखी वाचा
कन्या
मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव असेल. थकवा आणि अशक्तपणामुळे कामे मंद होतील. नोकरी व व्यवसायात सहकारी व अधिकारी नकारात्मक वागतील. संततीविषयक चिंता राहील. आणखी वाचा
तूळ
उक्ती आणि कृतीवर नियंत्रण हितावह ठरेल. हितशत्रूंपासून सावध राहा. तब्बेतीकडे लक्ष द्या. अचानक धनलाभ होईल. गूढ विद्या आणि रहस्यमय विषय यांचे आकर्षण राहील. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. वस्त्रालंकार, वाहन व भोजनसुख चांगले मिळेल. आणखी वाचा
धनु
घरात आनंददायी वातावरण राहील. शरीर स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता राहील नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण. सहकार्य मिळेल. आणखी वाचा
मकर
शारीरिकदृष्ट्या आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांना तुमचे काम आवडणार नाही. आणखी वाचा
कुंभ
भावूकतेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. सामाजिक प्रतिष्ठा भंग पावणार नाही, याकडे लक्ष द्या. घर आणि संपत्ती संबंधित कामे आज जपून करावीत. आणखी वाचा
मीन
सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल. मित्रांसोबत प्रवास- पर्यटन कराल. आणखी वाचा