आजचे राशीभविष्य - 06 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 07:13 AM2020-02-06T07:13:59+5:302020-02-06T07:20:39+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope - 06 February 2020 | आजचे राशीभविष्य - 06 फेब्रुवारी 2020

आजचे राशीभविष्य - 06 फेब्रुवारी 2020

Next

मेष
आज तुमचे मन चंचन राहील. त्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. त्यामुळे महत्त्वपूर्ण काम पुरे करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल पण नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा

वृषभ
आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भाऊबंदांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. कलाकार, कारागीर, आणि लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. आणखी वाचा

मिथुन
शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्हाला प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन आणि चांगले कपडे घालायला मिळतील. आणखी वाचा

कर्क
कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा असेल त्यामुळे बेचैन असाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा

सिंह
उत्तम भोजन प्राप्त होईल. मित्रांबरोबर रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. आणखी वाचा

कन्या
व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांची कृपादृष्टी असेल त्यामुळे पदोन्नतीची संधी मिळेल.  आणखी वाचा

तूळ
बौद्धिक काम व साहित्यलेखन यात गुंतून राहाल. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. परदेशात राहणार्‍या मित्र आणि सगे सोयरे यांच्या वार्ता समजल्याने तुम्ही प्रसन्न राहाल.  आणखी वाचा

वृश्चिक
कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

धनु
आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांबरोबर चांगला दिवस. स्वादिष्ट भोजन, नवे कपडे प्राप्त होतील. विरुद्ध लिंगी व्यक्तींबरोबर आकर्षण वाढेल. त्यांच्याबरोबर रोमांचक भेट होईल. आणखी वाचा

मकर
आज आपले स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्त होतील. कुटुंबीयांसमवेत आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती होण्यासाठी दिवस यश देणारा आहे. आणखी वाचा

कुंभ
वैचारिक दृष्ट्या गर्क राहिल्याने कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय न घेणे हेच बरे. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. मन अशांत राहील. आणखी वाचा

मीन
आजच्या दिवसात उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्या बरोबर वाद-विवाद होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - 06 February 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.