Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2021; मेषसाठी काळजीचा अन् तूळसाठी आनंदाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 07:11 AM2021-12-10T07:11:56+5:302021-12-10T07:16:19+5:30
Todays Horoscope 10 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष
कोणत्याही प्रकारच्या संकटात न पडण्याचा सल्ला. व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद घालत बसणे हिताचे नाही. दैव साथ देत नाही असे वाटेल. कामात त्वरित यश मिळणार नाही... आणखी वाचा
वृषभ
आपला हळवेपणा आपणाला बेचैन करील असे श्रीगणेश सांगतात. शरीर स्वास्थ्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या... आणखी वाचा
मिथुन
आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे. मनोरंजनाच्या 'मूड' मध्ये राहाल. मित्रांसह प्रवास- सहलीचे योग येतील. रुचकर खाणे आणि उंची वस्त्रे व दागिने उपलब्ध होतील... आणखी वाचा
कर्क
व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. माहेरहून आनंदाच्या वार्ता मिळतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला अनुकूल काळ... आणखी वाचा
सिंह
रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता आणि उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. सहकारी सहकार्य करतील... आणखी वाचा
कन्या
आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी आणि चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर अपमान होणार नाही याची काळजी घ्या. धनहानी संभवते. रागावर नियंत्रण ठेवा... आणखी वाचा
तूळ
नवे कार्य हाती घेण्यास दिवस शुभ आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मनात औदासिन्य पसरेल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल... आणखी वाचा
वृश्चिक
ठरवलेले काम पूर्ण न झाल्याने निराशा येईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचा अंतिम निर्णय घेऊ नये. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसमवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल... आणखी वाचा
आजचा दिवस आपणासाठी शुभ फलदायी आहे. कामेपूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्साही आणि ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहने कराल... आणखी वाचा
मकर
बोलणे आणि वागणे यामुळे भांडण होणार नाही याची दक्षता घ्या. संतापाचे प्रमाण वाढेल. पण कोणाशी वाद वा मतभेद होऊ देऊ नका. मन व्यग्र राहील. अध्यात्माच्या आधाराने मन शांत ठेवा... आणखी वाचा
कुंभ
सर्व दृष्टींनी आजचा दिवस लाभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल आणि परिणाम स्वरूप मान प्रतिष्ठा वाढेल. विवाहोत्सुकांना मनासारखा जोडीदार लाभेल. त्यामुळे आनंद वाढेल... आणखी वाचा
मीन
आजचा दिवस आपणाला सर्व दृष्टींनी लाभदायक आहे. परोपकाराचे कार्य हातून घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. उच्च अधिकारी वर्ग आनंदाने आपल्या कामाचे कौतुक करतील. व्यापारासंबंधी प्रवास घडेल... आणखी वाचा