आजचे राशीभविष्य - 11 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 07:03 AM2020-04-11T07:03:06+5:302020-04-11T07:03:29+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope - 11 April 2020 rkp | आजचे राशीभविष्य - 11 एप्रिल 2020

आजचे राशीभविष्य - 11 एप्रिल 2020

Next

मेष
आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहा. गुप्तशत्रूपासून सावध राहा. रहस्यमय गोष्टीत गोडी वाटेल आणि गूढ विद्येप्रती आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. आणखी वाचा

वृषभ
आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. स्वकीय आणि जवळच्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस फार चांगला जाईल. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो नाहक जाणार नाही. आर्थिक लाभाची शक्यता. तब्बेत चांगली राहील.  आणखी वाचा

कर्क
आज जरा दक्ष राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभाला अनुचित दिवस. मानसिक अशांतता आणि उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. आणखी वाचा

सिंह
आपला दिवस शुभफल देणारा नाही. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला जास्तच भास होतील. मातेचे आरोग्य बिघडेल.  आणखी वाचा

कन्या
बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे बनाल. आप्तमित्र यांची भेट होईल. भावंडाकडून फायदा होईल. आणखी वाचा

तूळ
आज आपली मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय नक्की होत नाही असे झाल्याने नवीन कामे सुरू करू नका. संबंधितांशी दुरुनच संबंध ठेवा नाहीतर मतभेद होतील. व्यवहारात जिद्द सोडा. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रियजनांशी सफल भेटी होतील.  आणखी वाचा

धनु
कुटुंबियां सोबच मतभेदाचे प्रसंग घडतील. स्वभावात रागीटपणा आल्याने कोणाशी वाद घालू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. वर्तन आणि बोलणे यावर संयम ठेवा. दुर्घटनेपासून सावध राहा. आणखी वाचा

मकर
सामाजिक कार्यांतून लाभ होईल कारण वेगवेगळ्या क्षेत्रांतून लाभ होण्याचा आज योग आहे. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. आणखी वाचा

कुंभ
आज आपल्याला अनुकूल दिवस आहे. आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. आणखी वाचा

मीन
मनातील दुःख आणि अशांतता याने दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील.. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - 11 April 2020 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.