राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२० - धनुला ठेवावा लागेल वाणीवर संयम, तर तुळा राशीला पदोन्नतीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 10:37 PM2020-10-10T22:37:45+5:302020-10-10T23:17:48+5:30
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष
मानसिक व्यग्रतेत आजचा दिवस जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. स्थावर संपत्ती विषयीची चर्चा टाळा. वाहन जपून चालवा तसेच जलाशयापासून दूर राहा. आणखी वाचा
वृषभ
उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष द्याल. आणखी वाचा
मिथुन
आर्थिक नियोजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्याबरोबर वातावरण खेळीमेळीचे राहील. मित्र आणि शुभेच्छुकांशी भेट झाल्याने आनंद मिळेल. आणखी वाचा
कर्क
मित्र आणि स्नेही यांच्याबरोबर आजचा दिवस तुम्ही उल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. प्रवास व सहली यांची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घ्याल. भाऊक बनाल. आणखी वाचा
सिंह
खूप भावविवश बनल्याने मन गुंतुन राहील. स्त्री वर्गापासून आज सांभाळून राहा. दलाली चर्चा वाद यापासून सांभाळून राहाल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत काळजी घ्या. वर्तनात संयम आणि विवेक ठेवा. आणखी वाचा
कन्या
वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात स्त्रीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. मित्राबरोबर एखाद्या रम्य- मनोहर स्थळी जाल. संततीकडून शुभवार्ता समजतील. आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश सांगतात, आपल्यासाठी आजचा दिवस शूभ आहे. नोकरी अथवा व्यवसायाच्या क्षेत्रात आपल्यासाठी अनुकूल वातावरण असेल. उच्चाधिकाऱ्यांसोबत आपण महत्वपूर्ण चर्चा कराल. पदोन्नतीचीही शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात उत्साहपूर्ण वातावरण राहील. आईकडून लाभ होईल. सरकारी कामांत यश मिळेल.
वृश्चिक
नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जपूनच काम करा. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीबरोबर मतभेद. आज महत्त्वपूर्ण निर्णय टाळा. आणखी वाचा
धनु
आजारावरील उपचारही प्रारंभ करू नका. वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवा. अधिक संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आरोग्याकडे लक्ष द्या. पैसा अधिक खर्च होईल. अनैतिक संबंध निषेधार्ह कामापासून दूर राहा. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल कुटुंबियांसमवेत दिवस चांगला जाईल. नोकरी धंद्यात सहकार्यांचे सहकार्य चांगले मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
मीन
आज आपली सृजनशक्ती अधिकच चमकेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्यविश्वाची सफर कराल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ. आणखी वाचा