आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2020; या राशीतील व्यक्तींना धनलाभाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 07:01 AM2020-08-13T07:01:30+5:302020-08-13T07:02:21+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज स्वतःचे खाजगी विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करा असे श्रीगणेश सांगतात. घर आणि घरातील व्यक्तींचे काम करताना समाधानकारक व्यवहार स्वीकारणे योग्य ठरेल. आणखी वाचा.
वृषभ - श्रीगणेश म्हणतात की आज आर्थिक जवाबदारीकडे खास लक्ष द्याल आणि योग्य आर्थिक नियोजनही कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा.
मिथुन - उक्ती आणि कृती यामुळे काही संकट उभे राहणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा.
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभकारी आहे. नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा.
सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव पडेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्यांवर आपल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडून ते आपणावर खूष राहतील. आणखी वाचा.
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेने भरलेला असेल असे श्रीगणेश सांगतात. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव असेल. थकवा आणि अशक्तपणामुळे कामे मंद होतील. आणखी वाचा.
तूळ - कोणाशी वादविवाद किंवा भांडण न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण हितावह ठरेल. आणखी वाचा.
वृश्चिक -आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. वस्त्रालंकार, वाहन व भोजनसुख चांगले मिळेल. मानप्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा.
धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस अनुकूल आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शरीर स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता राहील नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण. आणखी वाचा.
मकर - शारीरिकदृष्ट्या आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. आणखी वाचा.
कुंभ - स्वभावातील हट्टीपणा सोडण्याची सूचना श्रीगणेश देतात. भावूकतेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. सामाजिक प्रतिष्ठा भंग पावणार नाही, याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.
मीन - महत्त्वाचे निर्णय घ्यायला दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल. आणखी वाचा.