राशीभविष्य - १३ डिसेंबर २०२० - आर्थिक लाभ होईल, मानसिक दडपणातून मुक्त व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 11:03 PM2020-12-12T23:03:49+5:302020-12-12T23:04:15+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 13 December 2020 | राशीभविष्य - १३ डिसेंबर २०२० - आर्थिक लाभ होईल, मानसिक दडपणातून मुक्त व्हाल

राशीभविष्य - १३ डिसेंबर २०२० - आर्थिक लाभ होईल, मानसिक दडपणातून मुक्त व्हाल

Next

मेष
आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल. गूढ रहस्यमय विद्ये कडे आकर्षण राहील. गाढ चिंतन- मनन आपणाला अलौकिक अनुभूती देईल. वाणीवर संयम ठेवाल तर अनेक गैरसमजातून वाचाल. आणखी वाचा

वृषभ
संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. परिवारातील सदस्य आणि निकटचे मित्र यांच्या समवेत उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळपासच्या प्रवासाचे नियोजन कराल. तब्बेत चांगली राहील. आणखी वाचा

मिथुन
आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. तब्बेत चांगली राहील. आर्थिक लाभ होईल. ऑफिस मध्ये संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील. आणखी वाचा

कर्क
दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. तब्बेतीच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. अचानक धन खर्च होईल. प्रेमिकां मध्ये वादविवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. आणखी वाचा

सिंह
नकारात्मक विचार निराशा निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आईवडिलांशी मतभेद होतील. त्यांची तब्बेत बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. आणखी वाचा

कन्या
अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा असे श्रीगणेश सांगतात. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे आणि शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा

तूळ
क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा

वृश्चिक
तन- मनाने खुश आणि ताजेतवाने राहाल. कुटुंबीय आणि मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, भेट- मुलाखात होईल. जीवन साथीदारा बरोबर गाढ आपलेपणा निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

धनु
आजचा दिवस आपणासाठी कष्टदायक राहील. तब्बेत बिघडेल. परिवारातील व्यक्तींसोबत कटकट झाल्याने मन दुःखी होईल. त्यांमुळे मानसिक दृष्ट्या पण अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा.  आणखी वाचा

मकर
नोकरी- व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत आजचा दिवस आपणाला शुभ जाईल असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि आप्तेष्टांसह बाहर जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी आणि मुलगा यांच्याकडून लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ
आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश राहाल. नोकरी- व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारे आणि वरिष्ठ अधिकारी यांची कृपादृष्टी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल.  आणखी वाचा

मीन
नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. तब्बेतीची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी काम करताना सावध राहा. संततीच्या समस्या सतावतील.  आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 13 December 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.