आजचे राशीभविष्य - 14 जानेवारी 2021; मिथुनने संतापाला आवरावे, कन्या-तूळसाठी दिवस त्रासाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 07:29 AM2021-01-14T07:29:29+5:302021-01-14T07:29:56+5:30
Todays Horoscope 14 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - श्रीगणेश सांगतात की आपले एखादे काम किंवा प्रकल्पास सरकारकडून लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्दया संबंधी उच्च अधिकार्यांसमवेत विचार- विनिमय होईल. आणखी वाचा.
वृषभ - विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. आणखी वाचा.
मिथुन - श्रीगणेश सावधानतेचा इशारा देताना सांगतात की संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी, शस्त्रक्रिया आज करू नका. मितभाषा राहून मतभेद दूर करू शकाल. आणखी वाचा.
कर्क - संवेदनशीलता आणि प्रेमाने व्याप्त मन आज भिन्न लिंगीय व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज- मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इ. खरेदी होईल. आणखी वाचा.
सिंह - श्रीगणेश सांगतात की उदासीनता आणि शाशक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ बनवेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. आणखी वाचा.
कन्या - आजचा दिवस चिंता आणि उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे तब्बेत बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च उद्भवतील. आणखी वाचा.
तूळ - आज सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. विचारातील सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज यात्रा- प्रवास स्थगित ठेवा. आणखी वाचा.
वृश्चिक - कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग असल्याचे श्रीगणेश सांगतात. भावंडांशी कौटुंबिक चर्चा आणि नियोजन होईल. तन- मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. आणखी वाचा.
धनु - सावधानतेचा इशारा देताना श्रीगणेश सांगतात की कुटुंबातील व्यक्तींशी होणार्या गैरसमजा पासून बचाव करा. नाहक खर्च होईल. मानसिक उलघाल आणि द्विधा स्थिती यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा.
मकर - आजच्या दिवसाचा श्रीगणेश ईश्वरभक्ती आणि पूजा पाठ याने करावा. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आणखी वाचा.
कुंभ - पैशाची देवाण- घेवाण किंवा जामीनकी आपली फसवणूक करणार नाही याकडे लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल. आणखी वाचा.
मीन - समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारे आणि मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. आणखी वाचा.