आजचे राशीभविष्य - 14 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 07:10 AM2019-10-14T07:10:33+5:302019-10-14T07:11:08+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope 14 October 2019 | आजचे राशीभविष्य - 14 ऑक्टोबर 2019

आजचे राशीभविष्य - 14 ऑक्टोबर 2019

Next

मेष
कमी वेळात अधिक लाभ' या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका.  आणखी वाचा

वृषभ
घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील. जुन्या, बालपणच्या मित्रांच्या भेटीने मनाला आनंद होईल. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे. व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपला प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल.  आणखी वाचा

कर्क
वरिष्ठ अधिकार्‍यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. आणखी वाचा

सिंह
आज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला आहे. तब्बेतही सांभाळा. सरकार विरोधी घटनांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील.  आणखी वाचा

कन्या
सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. आणखी वाचा

तूळ
आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. गृहस्थी जीवनात सुख- शांती लाभेल.  आणखी वाचा

वृश्चिक
मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल. आणखी वाचा

धनु
आईची तब्बेत बिघडेल असे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. आणखी वाचा

मकर
महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. मित्र आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे आनंद वाटेल. आणखी वाचा

कुंभ
मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या- पिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थिरता येईल. आणखी वाचा

मीन
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहून उत्साही बनाल. नवीन कार्यारंभ करायला अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope 14 October 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.