आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2020; जुने येणे वसूल होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 07:19 AM2020-08-15T07:19:57+5:302020-08-15T07:20:13+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - श्रीगणेश म्हणतात की, विचारांची अस्थिरता अडचणीत आणेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आणखी वाचा.
वृषभ - मनाची द्विधा अवस्था ठोस निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्षात पडण्याचा संभव आहे. आणखी वाचा.
मिथुन - आजचा दिवस लाभदायक जाईल अशी आशा करू शकता. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र नातलग यांच्याबरोबर उत्तम जेवणाचा लाभ घ्याल. आणखी वाचा.
कर्क - शरीर आणि मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा निर्णय घ्यायला अतिशय कठिण करून सोडेल. कुटुंबीया बरोबर मतभेद झाल्याने मन उदास होईल. आणखी वाचा.
सिंह - श्रीगणेश म्हणतात की आज आपल्याला विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गहाळ राहिलात तर लाभापासून वंचित राहाल, तिकडे लक्ष द्या. आणखी वाचा.
कन्या - नवीन काम सुरू करायला निर्मित योजना अमलात आणायला आज उत्तम दिवस आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरदारांची पदोन्नती संभवते. आणखी वाचा.
तूळ - दूरचा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट द्याल. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरीही संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. आणखी वाचा.
वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस सावधानीपूर्वक व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अनैतिक आचरण तुम्हाला अडचणीत आणतील. आणखी वाचा.
धनु - बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य या साठी शुभ दिवस आहे. मनोरंजन, प्रवास, मित्राबरोबर भेटी, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्न लिंगीया बरोबर जवळीक या गोष्टी आजचा दिवस आनंदित बनवतील. आणखी वाचा.
मकर - श्रीगणेशांच्या कृपेने व्यापार धंद्यात वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस असल्यामुळे पैशाच्या देवाण घेवाणीत सरळपणा राहील. आणखी वाचा.
कुंभ - आज तुम्ही संतती व स्वतःचे स्वास्थ्य या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आणखी वाचा.
मीन - शारीरिक व मानसिक भय वाटेल. कुटुंबियांबरोबर वाद-विवाद होईल. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे तुमचा उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. आणखी वाचा.