आजचे राशीभविष्य - 15 नोव्हेंबर 2020, प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 10:30 PM2020-11-14T22:30:00+5:302020-11-14T22:30:03+5:30
Todays Horoscope 15 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. आणखी वाचा
वृषभ - व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा
मिथुन - गणेशजी सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा
कर्क - आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे आपल्या हिताचे ठरेल. आणखी वाचा
सिंह - आज धार्मिक यात्रेचा संकेत श्रीगणेश देतात. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कन्या - कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. आणखी वाचा
तूळ - समतोल आणि दृढ निश्चयाने तुमच्या दिवसाची सुरूवात होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थप्रति काळजी घेण्याचं आवाहन श्रीगणेशजींनी केलंय. नवीन कपडे आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसमेवत जे मतभेद झाले, ते दूर करावेत. आवश्यक निर्णय घेण्याचं आज टाळावे.
वृश्चिक -अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल असे श्रीगणेश सांगतात. मनात येणार्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा
मकर - स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणाला प्रोत्साहन देतील. आणखी वाचा
कुंभ - आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. दीर्घकालीन प्रवासाची योजना आखाल. आणखी वाचा
मीन - कोणाशी वादविवाद किंवा बांडण करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण राहील. आणखी वाचा